पुणे

वडगाव रासाईत मित्राचा दगडावर डोके आपटून खून

CD

आंधळगाव, ता. १७ : दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून मित्राचा खून झाल्याची धक्कादायक घटना वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे घडली. शनिवारी (ता. १६) रात्री सव्वाअकराच्या सुमारास हॉटेल सृष्टी बिअरबार समोर ही घटना घडली. अविनाश ऊर्फ विशाल जयवंत जावीर (वय ३०, रा. वडगाव रासाई), असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी वंदना अविनाश जावीर (वय ३५) यांनी मांडवगण फराटा (ता. शिरूर) पोलिस दूरक्षेत्रात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राहुल दत्ता गवांडे (रा. वडगाव रासाई) याला पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश यांचा वेल्डिंग व्यवसाय असून, पत्नी मोलमजुरी करतात. अविनाश व विशाल उदमले हे मित्र असून, वेळोवेळी ते एकत्र दारू पिण्यासाठी जात होते. शनिवारी रात्री दहा वाजता अविनाश यांना विशाल हा त्यांच्या घरी येऊन घेऊन गेला. त्यानंतर हॉटेल सृष्टीजवळ अंबिका पानटपरी शेजारी अविनाश, विशाल उदमले आणि राहुल हे तिघेही दारू पीत होते. दरम्यान दारू पाजण्याच्या कारणावरून अविनाश व राहुल यांच्यात झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी राहुल याने अविनाश याच्या चेहऱ्यावर बुक्के मारून त्याचे डोके दगडावर आपटले. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला वाचवण्यासाठी विशाल याने प्रयत्न केला व अजित शेलार याला मदतीस बोलावले. मात्र, तोपर्यंत अविनाश हा निपचित पडलेला होता. तातडीने त्याला वडगाव रासाई येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.

आरोपी २४ तासांत ताब्यात
घटनेनंतर आरोपी राहुल गवांडे पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, प्रभारी पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. पोलिस उपनिरीक्षक हणमंत नकाते यांनी तपासाची सूत्रे हाती घेऊन गोपनीय बातमीदारांच्या मदतीने अवघ्या चोवीस तासांत आरोपीला शोधून काढले. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली. सोमवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती घटनेचा तपास करणारे पोलिस उपनिरीक्षक हणमंत नकाते यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk ED Inquiry : 'गोकुळमध्ये विश्वास पाटील, अरूण डोंगळेंची ईडी चौकशी होणार', मंत्री मुश्रीफांची अडचण वाढणार; आमदार शिवाजी पाटलांची टीका

Pune: जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा;आंबेगावात सर्वाधिक टंचाई; टँकरचा ८९ हजार नागरिकांना आधार

Maharashtra Din 2026: महाराष्ट्र दिन अन् कामगार दिन दोन्ही 1 मे रोजीच का साजरे केले जातात? जाणून घ्या एकाच क्लिकवर

Commercial LPG Price Hike : निवडणुका संपताच सामान्यांना झटका! एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल १ हजारांची वाढ, काय आहे तुमच्या शहरातील ताजा दर?

Mumbai: विधान परिषद निवडणूक बिनविरोध?; दहा जागांसाठी दहा अर्ज; महाविकास आघाडीत अखेर एकमत

SCROLL FOR NEXT