पुणे

आरणगावील गव्हाची राज्यस्तरीय कृषी स्पर्धेत नोंद

CD

आंधळगाव, ता. २१ : आरणगाव (ता.शिरूर) येथील शेतकरी संतोष निवृत्ती लेंडे यांनी शास्त्रीय पद्धतीने घेतलेल्या गव्हाच्या पिकाने तब्बल पाच फूट उंची गाठली आहे. त्यामुळे त्याची तालुक्यात मोठी चर्चा सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत केलेल्या या प्रयोगाची कृषी विभागाने दखल घेत राज्यस्तरीय कृषी स्पर्धेत नोंद केली आहे.

पिकाच्या वाढीवरून एका एकरातून ३० ते ३२ क्विंटल उत्पादन मिळण्याची अपेक्षा लेंडे यांनी व्यक्त केली आहे. योग्य हवामान आणि काढणीपर्यंत पिकाची काळजी घेतल्यास हा अंदाज प्रत्यक्षात येऊ शकतो, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
लेंडे यांनी २७ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘गोल्ड ७१’ या उच्च उत्पादक जातीची निवड करून एका एकर क्षेत्रात पेरणी केली. एकूण २६ किलो दर्जेदार बियाण्यांचा वापर केला. पेरणीवेळी १५:१५:१५ या संतुलित खताचा बेसल डोस देण्यात आला. उगवणीनंतर वेळेवर खुरपणी करून तणनियंत्रण केले. त्यानंतर पिकाच्या वाढीच्या टप्प्यानुसार युरियाचा डोस देण्यात आला. हिंदवी कृषी सेवा केंद्राचे संचालक दिनेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कीड व रोगनियंत्रणासाठी योग्य वेळी फवारणी करण्यात आली. पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करत आतापर्यंत सहा वेळा पाणी देण्यात आले.प्रत्येक टप्प्यावर पिकाची वाढ, रंग, ताठरपणा आणि फुटव्यांची संख्या यावर लक्ष ठेवण्यात आले.

सध्या शेतातील गव्हाच्या पिकाने पाच फूट उंची गाठली असून दाट फुटवे, भरघोस कणसे आणि ताठ उभी वाढ ही वैशिष्ट्ये पाहायला मिळत आहेत. तालुक्यात इतरत्र ज्वारी किंवा गहू तीन-चार फूटांपर्यंत वाढलेला असताना लेंडे यांच्या शेतातील पाच फूट उंचीचा गहू शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तालुका कृषी अधिकारी संतोष वाघचौरे व कृषी साहाय्यक जगवंत भगत यांनी शेताला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पिकाची स्थिती, वाढीचे प्रमाण आणि व्यवस्थापनाची पद्धत समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यस्तरीय कृषी स्पर्धेसाठी या पिकाची नोंद करण्यात आली असून अंतिम उत्पादनानुसार मूल्यमापन होणार आहे.

शेतीमध्ये योग्य नियोजन, वेळेवर खत व्यवस्थापन, पाणी आणि कीडनियंत्रण यांचा समन्वय साधला तर उत्पादनात लक्षणीय वाढ होते. आमच्या शेतातील गव्हातून ३० ते ३२ क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे.
- संतोष निवृत्ती लेंडे, शेतकरी, आरणगाव

02841

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goregaon Drugs Party: ''मला एक पिवळी गोळी खायला दिली...'' शुद्धीवर आलेल्या तरुणीचा जबाब; पार्टीतली 'नो कॅमेरा पॉलिसी' काय होती?

'होय मी जयभीमवाली' चिन्मयी सुमीतनं मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या... 'मी आंबेडकरांची फॅन आहे आणि जय भीम म्हणण्यामागे...'

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

भाविकांच्या बसचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, २५ जखमी

Pune Yerwada News: पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णांची हेळसांड थांबवा; सहसंचालक डॉ. गोल्‍हाइत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..

SCROLL FOR NEXT