आंधळगाव, ता. २० : पारोडी (ता. शिरूर) येथे भीमा नदीच्या काठावरील शेतकऱ्याचा विद्युत पंप चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (ता. २०) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी अंकुश सुदाम डफळ यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शिवतक्रार म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील अंकुश सुदाम डफळ (वय ४४, रा. धामारी, ता. शिरूर) यांची भीमा नदीलगत स्वमालकीची शेती आहे. पिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी त्यांनी नदीकाठी विद्युत पंप बसवून पाईपलाईनद्वारे शेतात पाणी आणण्याची व्यवस्था केली आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास शेजारील शेतकरी नदीकाठी गेले असता संबंधित पंप जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ अंकुश डफळ यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. डफळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता नदीकाठी बसवलेला विद्युत पंप चोरट्यांनी लंपास केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्य़ाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.