पुणे

शिरसगाव काट्यात पोहोचले चासकमान कालव्याचे पाणी

CD

आंधळगाव, ता. २० : चासकमान कालव्याच्या ‘टेल’ला असलेल्या शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथे अखेर कालव्याचे पाणी दाखल झाल्याने दीर्घकाळ प्रलंबित असलेला शेतीचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिरसगाव काटा परिसरातील शेती प्रामुख्याने या कालव्यावर अवलंबून आहे. गतवर्षी कालव्याचे पाणी न आल्याने शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला होता. यंदाही पाणी येईल की नाही, याबाबत शेतकरी चिंतेत होते. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी आमदार माऊली कटके यांच्याकडे पाठपुरावा केला. परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत आमदार कटके यांनी संबंधित विभागाशी समन्वय साधत तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर कालव्याचे पाणी शिरसगाव काटा येथे दाखल झाले.
पाणी गावात पोहोचताच ग्रामस्थांनी जलपूजन करून आनंदोत्सव साजरा केला. कालव्याच्या पाण्याजवळ विधीवत पूजन करण्यात आले. लहान मुले, तरुण, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी माजी सभापती दादासाहेब कोळपे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष गोपाल काटे, जयदीप पवार, माणिक कदम, दीपक केदारी, अर्जुन विधाते, सर्जेराव केदारी, तन्मय केदारी, विलास जाधव, सुयश भोसले, भीमराव विधाते, बाळासाहेब विधाते, विनायक विधाते आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT