पुणे

घोड नदी कोरडी पडल्याने दहा गावांत पाणीटंचाई

CD

मांडवगण फराटा, ता. २७ : शिरूर-श्रीगोंदा तालुक्यांची जीवनवाहिनी ठरलेली घोड नदी कोरडीठाक पडली आहे. गेल्या आठ दिवसांपासून नदीपात्रात पाण्याचा पूर्ण खडखडाट झाला असून शिरसगाव काटा ते इनामगाव, तांदळीपर्यंतच्या पट्ट्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी आणि शेती या दोन्ही गरजांसाठी नदीवर अवलंबून असलेल्या दोन्ही तालुक्यातील किमान दहा गावांवर पाणीटंचाईचे तीव्र सावट दाटले आहे.
शिरूर तालुक्यातील चिंचणी, शिरसगाव काटा, पिंपळसुटी, इनामगाव, तांदळी तसेच श्रीगोंदा तालुक्यातील बोरी, हंगेवाडी, वांगदारी, काष्टी, सांगवी या गावांची तहान भागवणारी नदी आज वाळूच्या ढिगाऱ्यांत हरवली आहे. नदीपात्रात जागोजागी तडे गेलेले दिसत असून अनेक ठिकाणी कृषिपंप उघड्यावर पडले आहेत. शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेली पाणी उचल यंत्रणा निष्क्रिय ठरली आहे.
इनामगाव परिसरात काही ठिकाणी पाण्याची छोटी डबकी शिल्लक असली, तरी शिरसगाव काटा ते पिंपळसुटी दरम्यानचा पट्टा पूर्ण कोरडा आहे. गेल्या दोन दिवसांत परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. विविध गावच्या पाणीपुरवठा योजनांवरही ताण वाढला आहे.
शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विजय मोकाशी तसेच इनामगावच्या माजी सरपंच पल्लवी घाटगे यांनी प्रशासनाने विलंब न लावता नदीपात्रात पाणी सोडावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून अद्याप ठोस निर्णय जाहीर झालेला नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. तातडीच्या उपाययोजना न झाल्यास टंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

पिके कशी जगवायची?
उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. अजून किमान तीन महिने कडक उष्णतेचे शिल्लक असताना जूनपर्यंत पिके कशी जगवायची, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. ऊस, भाजीपाला व इतर पिके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर असून उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत आहे. परिस्थिती कायम राहिल्यास शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळून कर्जबाजारीपण वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर घोड धरणातून तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: शेअर बाजार कोसळला! 5 लाख कोटींचे नुकसान; मात्र हा शेअर 13% वाढला

Navi Mumbai: मुंबईकरांना वाहतुकीच्या समस्येपासून दिलासा मिळणार! ऐरोली-घणसोली उन्नत मार्गाच्या कामाला सुरूवात, कसा आहे मार्ग?

Vadgaon Sheri News : बुलेटच्या सायलेन्सरवर फिरवला रोडरोलर; वडगाव शेरी आणि विमानतळ परिसरात पोलिसांची कारवाई

Latest Marathi News Live Update : जळगावमध्ये आठवीतील विद्यार्थ्याची आत्महत्या

Agriculture News : तळवडेत कडक उन्हातही बाजरीचे पीक तरारले, शेतकऱ्यांचा वाढता कल; कमी पाणी अन् खर्चही कमी असल्याचा परिणाम

SCROLL FOR NEXT