आंधळगाव, ता. १० : रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत सोमवारी (ता. ९) जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रदीपा रणदिवेया होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थिनी परिणीती रणदिवे, तन्वी जगताप, त्रिशा रणपिसे, स्वरा जाधव, आर्या रणदिवे, ईश्वरी रणदिवे, दर्या रणदिवे, रिंकू भंडलकर, दिव्या कोळेकर, जान्हवी भोसले, आर्या पठारे, आर्या गायकवाड, अनुष्का पाटोळे, आरती कदम, स्वरा रणपिसे, कादंबरी भंडलकर, स्वरा रणदिवे, त्रिशा कोळपे आदींनी जिजामाता, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर आदी थोर महिलांची वेशभूषा साकारत प्रभावी सादरीकरण केले.
विद्यार्थिनी आराध्या पठारे हिने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी भागवत व श्रावणी गोते यांनी केले. शिक्षिका लंघे यांनी महिला दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. सरपंच प्रदीपा रणदिवे व माया रणदिवे यांनी मार्गदर्शन केले, तर गौतम भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आयोजन येथील मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीने केले. यावेळी कात्रज दूध संघाचे संचालक निखिल तांबे, उपसरपंच अजित रणदिवे, मुख्याध्यापक हिरामण शेलार, भानुदास रोकडे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज वाडकर, गणेश भागवत, गौतम भोसले, सुवर्णा रणदिवे, अश्विनी अवचिते, गौरी रणदिवे, नीलम रणदिवे, मेघा भोसले, मंगल म्हस्के, अश्विनी वसव, हरिभाऊ भंडलकर, पोपट तांबे, तानाजी कुंभार, सुदाम रणदिवे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.