आंधळगाव, ता. २५ : शिरूर तालुक्यातील शिवतक्रार म्हाळुंगी येथे शेतातून जाण्याच्या रस्त्याच्या कारणावरून दोन शेतकऱ्यांमध्ये झालेल्या वादातून मारहाणीची घटना गुरुवारी (ता. २३) घडली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात तिघांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आनंदा संतू साळुंखे व चंद्रकांत कोंडिबा शिवले यांची शेती शेजारी आहे. शेतात जाणाऱ्या रस्त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद वाढत जाऊन दोघांनी एकमेकांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर मारहाण केल्याने दोघेही जखमी झाले. दरम्यान, आनंदा साळुंखे यांचा मुलगा दत्तात्रेय घटनास्थळी आला. त्यानेही वादात सहभागी होत मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेप्रकरणी आनंदा संतू साळुंखे (वय ६५) व चंद्रकांत कोंडिबा शिवले (वय ६५,दोघेही रा.शिवतक्रार म्हाळुंगी,ता.शिरूर) परस्परविरोधी तक्रारी दिल्या. त्यानुसार पोलिसांनी आनंदा संतू साळुंखे, दत्तात्रेय आनंदा साळुंखे व चंद्रकांत कोंडिबा शिवले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार संदीप इथापे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.