पुणे

आळंदी देवस्थानची कार्तिकी वारी सोहळ्यासाठी तयारी

CD

आळंदी, ता. १९ : कार्तिकी वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून आळंदीत येणाऱ्या भाविकांना दर्शन मंडपात खिचडी प्रसाद, चहा, केळी आणि पिण्याच्या पाण्याची सेवा मोफत दिली जाणार आहे. दरम्यान, भाविकांची सुरक्षितता जपण्यासाठी आणि मंदिर परिसरात चोऱ्‍या होऊ नये, यासाठी देवस्थानच्या व्यवस्थापनाने नव्वद सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. याबाबत अधिक माहिती देताना आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर वीर यांनी सांगितले की, कार्तिकी वारी काळात लाखो भाविक संत ज्ञानेश्‍वरांच्या संजीवन समाधी दर्शनासाठी आळंदीत येतात. तासन् तास भाविकांना रांगेत उभे राहावे लागते. अशा वेळी इतर दर्शन मंडपाबाहेर जावे लागू नये यासाठी दर्शन मंडपातील भाविकांना मोफत खिचडी, चहा, पाणी, केळी दिली जाणार आहे. मंदिराच्या दक्षिण बाजूकडील आजोळ घराच्या जागेतील दर्शन मंडपामध्ये देवस्थानचे शिपाई तर इंद्रायणीकाठच्या दर्शन मंडपामध्ये स्वयंसेवी सेवाभावी स्वयंसेवकांकडून खिचडी, पाणी वाटप केले जाईल.
मंदिरात, दर्शन मंडपात आणि मंदिराभोवती चोऱ्या रोखण्यासाठी, चोरांवर नजर ठेवण्यासाठी नव्वद सीसीटीव्ही उभारले आहेत. याचबरोबर मंदिराच्या आतील बाजूस, दर्शन मंडपात आणि प्रवेशद्वारात पोलिसांचा बंदोबस्त ठेवला जाणार आहे.
वारी काळात संत ज्ञानेश्‍वर माउलींच्या संजीवन समाधीच्या लाइव्ह दर्शनाची सोय देवस्थानने केली आहे. यासाठी मंदिरात, दर्शन मंडपात आणि पुंडलिक मंदिरात स्क्रीन बसविले जाणार आहेत. वारीसाठी बाहेरून येणाऱ्‍या दिंड्यांना देवस्थानकडून निमंत्रण दिले आहे. दिंड्यांचे मंदिर प्रवेश पास वाटप सुरू आहे. सप्तमी आणि अष्टमीच्या दिवशी दिंड्यांना प्रवेश दिला जाईल. सध्या देऊळवाड्यावर विद्युत रोषणाई करण्याचे काम सुरू आहे. याचबरोबर वारी काळात देऊळवाडा, समाधी गाभारा आकर्षक फुलांनी सजविला जाणार आहे.
वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना संत ज्ञानेश्‍वरांच्या ज्ञानेश्‍वरीची पारायण प्रत ऐंशी रुपयांत ना नफा ना तोटा तत्त्वावर विक्री केली जाते. सुमारे पाच हजार ज्ञानेश्‍वरी पहिल्या टप्प्यात छपाई करून विक्रीसाठी मंदिरात ठेवल्या आहेत, तर लाडू प्रसाद म्हणून शेंगदाणा गूळ आणि बुंदीचे लाडूही बनविण्याचे काम सुरू आहे.
द्वादशीच्या दिवशी करण्यात येणाऱ्या रथोत्सवासाठी देवस्थानने जुना लाकडी रथ तयार ठेवला आहे. रथाचे पॉलिशिंग आणि त्यावर आकर्षक विद्युत रोषणाईचे काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा कहर ! 'या' जिल्ह्यात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद, अनेक भागांत उष्णतेची लाट

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे दोन हप्ते एकत्र? महिलांना मिळू शकतात थेट ३००० रुपये, पण पैसे नेमके कधी येणार?

Latest Marathi News Live Update : क्रिप्टो गुंतवणूक योजनेच्या नावाखाली झालेल्या सुमारे 6.50 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा भंडाफोड

Bribery Case Police : फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली ७ लाखांची लाच, खाकीला बदनाम करणाऱ्या शेख, कांबळेचा रुबाब उतरला

Bee Attack:परीक्षा संपताच विद्यार्थ्यांवर आग्या मधमाश्‍यांचा हल्ला; वाकी शिवणे येथील घटना; वाहनचालकाचा जीव धाेक्यात अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT