पुणे

कोट्यवधी रुपये खर्चूनही कृत्रिम पाणीटंचाई

CD

आळंदी, ता. १७ : भामा आसखेड धरणाचे पाणी मिळाले... कोट्यवधी रुपयांची जलवाहिनी... जलशुद्धीकरण केंद्र... जलकुंभ बांधले.... मात्र, पाणीपुरवठा विभागाचा ढिसाळ यंत्रणा आणि हद्दीबाहेर बेसुमार नळजोड दिल्याने आळंदीकरांना दिवसाआड केला जाणारा पाणीपुरवठा थेट दोन ते चार दिवसांवर जात आहे. भामा आसखेड धरणातून दहा एमएलडी पाणी मंजूर होवूनही कृत्रिम पाणीटंचाईला गेल्या चार वर्षांहून अधिक काळ आळंदीकरांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.
आळंदी शहराची लोकसंख्या ३५ लाखांवर पोहोचली आहे. दर्शन आणि लग्नांच्या निमित्ताने सरासरी २० हजार लोक दिवसाला येतात. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आळंदीसाठी ४० कोटींची जलवाहिनी, पाच कोटींचे सहा जलकुंभ, साडेपाच कोटींचे जलशुद्धीकरण केंद्र बांधून दिले. सोबत भामा आसखेडवरून पुण्याला जाणाऱ्या जलवाहिनीला जोड देत दहा एमएलडी पाणी मंजूर केले. एवढी यंत्रणा उपलब्ध असूनही नियोजनाचा अभाव आणि पाणी वितरणात दुजाभाव केल्याने आळंदीकरांना पाण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. साधारणत: २०१९पासून दिवसाआड आणि विभागवार पाणीपुरवठ्याचे नियोजन केले. मात्र, काही भागांत कमी-जास्त पाणी सोडले जाते. त्यातच पाणी शुद्धीकरणाला लागणारा वेळ, वीजपुरवठा खंडित होणे, जलवाहिनी फुटणे असे प्रकार झाल्यानंतर दिवसाआड होणारा पाणीपुरवठा दोन-चार दिवसांवर जातो. याचबरोबर नगर परिषदेकडून पाणीपुरवठ्याची वेळ सांगितली जाते, पण त्या वेळेला पाणीपुरवठा होईल याची खात्री नसते. चार-पाच तास उशिरानेच पाणी पुरवठा होतो. यामुळे भांडी घेऊन नळापुढेच बसायचे का? असा सवाल महिला वर्गातून केला जात आहे.

हद्दीबाहेर बेसुमार नळजोड
नगर परिषदेने हद्दीबाहेर चऱ्होलीतील नागरिकांना बेसुमार नळजोड दिले. याचा परिणाम शहरातील पाण्याची गरज पूर्ण केली जात नसल्याचे चित्र आहे. नगर परिषदेकडे सध्या एकूण नळजोड किती? याचीही आकडेवारी नसल्याचे विदारक चित्र आहे.

नागरिकांसह लोकप्रतिनिधीही निरुत्साही
भामा आसखेडचे पाणी मिळूनही आळंदीत मोठ्या प्रमाणात जारची विक्री केली जाते. नागरिकांची जारच्या पाण्यालाच पसंती दिसून येते. पाणीपुरवठ्याबाबत कट्ट्यावर बसून गप्पा मारतात. मात्र, आजपर्यंत आंदोलन, हंडामोर्चा अभावानेच झाला. राजकीय मंडळी आणि प्रशासन नागरिकांना दाद देत नसल्याचाच हा परिणाम आहे. नागरी प्रश्‍नांसाठी काही मोजकेच माजी नगरसेवक उभे असतात.

आम्ही गावठाणात राहतो. दिवसाआड पाणी उशिराने आले, की तिसऱ्या दिवशीच पाणी येते, तेही उशिरानेच. पाणी सोडण्याची वेळ निश्‍चित नाही. घरातील महिलांचे कामाचे गणित बिघडते. आलेले पाणीही जेमतेम आणि कमी दाबाने येते.
-संकेत कुऱ्‍हाडे, नागरिक

आळंदीत असा एकही भाग नाही जिथे तीन-चार दिवस पाण्यास विलंब होतो. उन्हाळा आला, तर पाणीपुरवठा करण्यास उशीर होतो. पाणी शुद्धीकरण, वितरण याचा ताळमेळ जुळत नाही. एक जलकुंभ भरल्यानंतर दुसरा भरण्यास विलंब होत आहे. आळंदी शहराला अजून तीन जलकुंभांची गरज आहे. यासाठी नगरोत्थान, जिल्हा वार्षिक योजनांमधून धोरणात्मक सुधारणा करत आहोत. पाणीपुरवठ्यासह विविध कामांसाठी साडेतीन कोटींची मागणी केली आहे. सध्या चाकण रस्ता आणि पद्मावती रस्त्यावर सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन जलवाहिनी जोड दिला जात आहे. येत्या आठवडाभरात काम पूर्ण होईल.
-कैलास केंद्रे, मुख्याधिकारी, आळंदी नगर परिषद


१) भामा आसखेडमधून दहा एमएलडी पाणी मंजूर; पण प्रत्यक्षात सात ते आठ एमएलडीच पाणी येते
२) पाणी शुद्धीकरण आणि वितरण करण्यास चार ते पाच तासांचा कालावधी लागतो. परिणामी पुढचे पाच जलकुंभ भरण्यासाठी कसरत होते
२) हद्दीबाहेरचे नळजोड नियंत्रित करणे आवश्यक
३) पाणी सोडण्यासाठीच्या व्हॉल्व्हची संख्या ३००हून अधिक
४) पाणी वितरणात वशिलेबाजी
५) नागरिकांचे मोबाईल उचलले जात नाहीत
६) विभागवार पद्धतीने जवळपास आठ झोन आणि दिवसाआड वितरण
७) पाणी वितरणाची वेळ निश्‍चित नाही.

उपाययोजना
१) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने योजना बनवली असल्याने त्यांच्याकडूनच पूर्ण वर्षभर जलशुद्धीकरण आणि वितरण व्यवस्था चालविण्यास देणे
२) पाणी सोडण्यासाठीच्या व्हॉल्व्हची संख्या नियंत्रित करणे
३) आळंदी शहर आणि काळेवाडी-देहू फाटा या दोन भागांत स्वतंत्र मुख्य जलवाहिनीची गरज
४) बंद ठेवलेले जुन्या जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती करून सुरू करणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs GT Live : वन अँड ओन्ली शुभमन गिल! IPL मध्ये नोंदवला विराट, रोहितलाही न जमलेला विक्रम... सुदर्शनसह मिळून आणखी एक पराक्रम

Pune Highway Protest: दोन दिवसांत आरोपींना बेड्या ठोकल्या नाहीत, तर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला जाईल," - आमदार रोहित पवार

LPL Rules: क्रिकेटमधील धक्कादायक नियम! फॉलोअर्सनुसार खेळाडूंची लीगमध्ये निवड होणार; नव्या नियमाने चाहत्यांमध्ये संताप

School Safety: नवीन तमलूर जि.प. शाळेची इमारत धोक्यात; पावसाळ्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने स्थलांतराची ग्रामस्थांची मागणी

Megablock: मध्य रेल्वेवर दोन दिवस विशेष ब्लॉक, लोकलसह मेल-एक्स्प्रेसवरही परिणाम, पण कधी? पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT