पुणे

आळंदी नगरपरिषद कार्यालयाचे बदलले रुपडे

CD

आळंदी, ता. १९ : नगर परिषदेमार्फत शिवसृष्टीजवळ नगर परिषद कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गात सुंदर स्वागत कमानीची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना नगर परिषद कार्यालय नेमके कुठे आहे, हे समजण्याबरोबरच शहराच्या वैभवातदेखील भर पडली आहे. नगर परिषदेने पावणेदोन कोटींचा निधी खर्च करून सुशोभिकरणाबरोबरच बसस्थानकावर सुलभ शौचालयाचेही काम सुरू केले आहे.
आळंदी नगर परिषदेची प्रमुख प्रशासकीय इमारत साधारणतः ७ वर्षांपूर्वी पडली असून, तेव्हापासून नगर परिषदेचा कारभार टाऊन हॉल इमारतीतून सुरू आहे. टाऊन हॉलची इमारत १९८९पासून अत्यंत जुन्या स्वरूपात होती; परंतु मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या वास्तूचे नूतनीकरण केले. नूतनीकरणात दुरुस्ती, रंगरंगोटी, फर्निचरचे काम करण्यात आले. त्यानंतर कार्यालयासमोर रस्त्याचे काँक्रिटीकरण करून स्वागत कमानीची उभारणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून ९४ लाख खर्च करून हे कॉंक्रिटीकरण करण्यात आले, तर नगर परिषदेच्या १२ लाख रुपये स्वनिधीतून स्वागत कमान तयार करण्यात आली.
या विकासकामांमुळे या संपूर्ण परिसराच्या व पर्यायाने आळंदी शहराच्या वैभवात भर पडली असून, आळंदीकरांकडून याचे कौतुक केले जात आहे. याच्या शेजारीच असलेल्या बस स्थानकात पुरुष व स्त्रियांसाठी सुसज्ज टॉयलेट ब्लॉक उभारणीचे कामही आळंदी नगर परिषदेमार्फत सुरू झाले असून, प्रवाशांची गैरसोय यामुळे दूर होणार आहे. यासाठी ७४ लाखांचा निधी खर्च करण्यात येत आहे. सदर टॉयलेट ब्लॉकचे कामाबरोबरच बस स्थानकात खड्ड्यांचा प्रश्‍न कायमचा सोडविण्यासाठी काँक्रिटीकरण मंजूर करण्यात आले असून, लवकरच हे कामदेखील सुरू होणार असल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT