पुणे

आळंदीत हिमालयीन समर्पण ध्यानयोग शिबिर

CD

आळंदी, ता. ४ : बाराव्या शतकामध्ये संत ज्ञानेश्‍वर माऊलींनी सांगितलेला आत्मधर्म, विश्‍वधर्म आणि ध्यानाची प्रत्यक्ष अनुभूती घेण्याचा सुवर्णयोग वारकरी साधक आणि आळंदी परिसरात राहणाऱ्यांना मिळणार आहे.
निमित्त आहे आळंदीतील मुंबई मराठा फ्रुटवाला धर्मशाळेतील गुरुवार (ता. १०) एप्रिल ते शनिवार (ता. १२) दरम्यान सायंकाळी ५ ते ८ या वेळेत होणाऱ्या हिमालयीन समर्पण ध्यान महाशिबिराचे. या शिबिराचे आयोजन आळंदी देवस्थान आणि श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन यांच्या वतीने होत आहे. शिबिर पूर्णपणे नि:शुल्क आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात वाढलेला तणाव, दुःख आणि त्या दुःखाला दूर करण्यासाठी हे शिबिर उपयुक्त आहे.
ज्ञानेश्‍वर महाराजांनी आत्मानुभूती बाबत, विश्‍वधर्म, आत्मधर्म बाबत जे सांगितले त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा सुयोग या अद्वितीय तीन दिवसीय निःशुल्क हिमालयीन समर्पण ध्यानयोग शिबिराच्या माध्यमातून घडणार आहे. अधिक माहितीसाठी ९६६५७९५६७८/९१३७२४७९३३ येथे संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यातील नवले पूलावर रास्तारोको; मोठी वाहतूक कोंडी, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Who is Ramakrishna Ghosh? नाशिकचा जन्म, पुण्यात गिरवले क्रिकेटचे धडे... CSK कडून आणखी एका महाराष्ट्रीय खेळाडूचे पदार्पण

Pune Girls Safety Crisis: बालिकांवरील लैंगिक अत्याचारांची मालिका; पुणेकरांचा संतप्त सवाल – ‘पुण्यात लेकी सुरक्षित आहेत तरी कुठे?’

HSC Exam Result : अंध मुलींचे बारावी परीक्षेत यश; जागृती स्किल डेव्हलपमेंट सेंटरचा फॉर ब्लाइंड गर्ल्सचा १००% निकाल कायम

Who is Raghu Sharma? मुंबई इंडियन्सने क्रीडा आहारतज्ज्ञ अन् ट्रेनरला दिली पदार्पणाची संधी; CSK विरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार

SCROLL FOR NEXT