पुणे

आळंदीत ३ मेपासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

CD

आळंदी, ता. १५ : श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७५०वा जन्मोत्सवाच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त आळंदी देवस्थानच्या वतीने ३ मेपासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पारायणासाठी राज्यभरातून १० हजार भाविकांचे नियोजन केले आहे. तर हरिनाम सप्ताहात राज्यभरातील दिग्गज कीर्तनकार, प्रवचनकारांच्या सेवेचा लाभ भाविकांना होणार आहे.
ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ३ ते १० मे दरम्यान आळंदीत चाकण-केळगाव रस्त्यावरील भैरवनाथ देवस्थानच्या जागेत होणार आहे. दररोज सकाळी ६ ते १० या वेळेत पारायण होणार आहे. पारायणासाठीचे व्यासपीठ ह.भ.प. एकनाथ महाराज कोष्टी आणि ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर चालविणार आहेत. पारायणानंतर दररोज सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत ह.भ.प. बापूसाहेब देहूकर, ह.भ.प अच्युत महाराज दस्तापूरकर, ह.भ.प. प्रसाद महाराज बडवे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज नामदास, ह.भ.प. विठ्ठल महाराज वासकर, ह.भ.प. भरत महाराज पाटील यांचे किर्तन होणार आहे.
दुपारी ४ ते ५ वाजेपर्यंत ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर, ह.भ.प. विष्णू महाराज केंद्रे, ह.भ.प. यशोधन महाराज साखरे, ह.भ.प. रामकृष्ण महाराज लहवितकर, ह.भ.प. नारायण महाराज जाधव, ह.भ.प. सदानंद महाराज मोरे यांचे प्रवचन होईल. त्यानंतर दररोज सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत ह.भ.प. विश्वनाथ महाराज वारिंगे, ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप, ह.भ.प. जयवंत महाराज बोधले, ह.भ.प. केशव महाराज उखळीकर, ह.भ.प. रामभाऊ महाराज राऊत, ह.भ.प. चंद्रशेखर महाराज देगलूकर यांची कीर्तने होतील.
५ मेपर्यंत दररोज दुपारी दीड ते साडेतीन वाजेपर्यंत जगद्गगुरू संत तुकाराम महाराज ३७५व्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त जगद्गगुरू संत तुकाराम महाराज यांचे चरित्र चिंतन ह.भ..प रामभाऊ महाराज राऊत हे सांगतील. ६ ते ९ मे दरम्यान दररोज दुपारी दीड ते साडेतीन वाजेपर्यंत संत ज्ञानेश्वर महाराज चिंतन ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूकर हे सांगतील. ९ मे रोजी रात्री ९ते ११ वाजता दिंडी प्रदक्षिणा होणार आहे, तर १० मे रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत शांतीब्रम्ह मारोती महाराज कुरेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता होणार आहे.
---
सोहळ्याची वैशिष्ट्ये :
एकाच वेळी १० हजार वारकरी पारायणास बसणार.
पारायण करणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यास ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि हरिपाठ पुस्तिका भेट.
परगावच्या भाविकांच्या निवासाची व्यवस्था देवस्थान करणार.
मुक्तद्वारालगत दोनवेळच्या जेवणाची व्यवस्था.
अखेरच्या दिवशी मांडे भोजन आणि आमरसाची मेजवानी.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT