पुणे

दारू विक्रीप्रकरणी आळंदीत छापे

CD

आळंदी, ता. १ : येथे वर्षानुवर्षे पिढी जात अवैध दारू विक्री करणाऱ्या चावडी चौक आणि चाकण चौक येथील दोन व्यावसायिकांवर आळंदी पोलिसांनी छापा मारून गुन्हा दाखल केला.
शनिवारी (ता. ३१) सकाळच्या वेळी ही कारवाई केली. याप्रकरणी चाकण चौक येथे अवैध दारू धंदा करणाऱ्या रेखा ज्ञानेश्वर कांबळे (अंदाजे वय ३७) आणि कौस्तुभ दिलीप दौंडकर (अंदाजे वय ३८) यांच्याविरोधात आळंदी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत माहिती देताना आळंदी पोलिसांनी सांगितले की, आळंदीतील मंडलाधिकारी कार्यालयामागील चावडी चौकातील एका धर्मशाळेच्या बाजूला असलेल्या घरामध्ये कौस्तुभ दौंडकर हा २७५ रुपये किमतीची देशी दारू बाळगून व्यवसाय करत होता. त्यास आळंदी पोलीस पकडण्यासाठी गेले असता त्याने पोबारा केला. तर आळंदीतील प्रमुख वर्दळीचे ठिकाण असलेल्या चाकण चौकामध्ये रेखा कांबळे रात्री साडेआठच्या दरम्यान २१०० रुपये किमतीचे देशी दारू बाळगत असताना पोलीस तिला पकडण्यासाठी गेले तेव्हा तीही पोबारा करून पळून गेली. दौंडकर आणि कांबळे यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक तपास आळंदी पोलीस करत आहेत.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्याने शहरातील अन्य दारू धंद्यांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान दोन्ही दारू धंदे अनेक वर्षांपासून मध्यवर्ती ठिकाणी चालत असल्याने आणि पोलीस ठाण्यापासून काही क्षणाच्या अंतरावर असल्याने आळंदी करांमध्ये याबाबत चर्चा होती. या कारवाईमुळे शहरातील अन्य ठिकाणी म्हणजेच पद्मावती रस्ता, वडगाव रस्ता, मरकळ रस्ता, तसेच खंडोबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दारू धंद्यांवर कारवाई कधी होणार? याबाबत उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Deadline 2026: ITR भरण्यासाठी फक्त 4 दिवस शिल्लक! 31 जुलैची मुदत चुकल्यास दंडासह 'हे' मोठे नुकसान होऊ शकते

"मी काय करावे, हे मला कुणीही सांगू शकत नाही!" Sanju Samson चं धाडसी विधान; गौतम गंभीरला अप्रत्यक्ष इशारा? नेमकं काय म्हणाला?

'जळत्या सिगारेटचा चटका अन् वाटेल तिथं स्पर्श...' अभिनेत्रीनं सांगितला सर्वात वाईट अनुभव, म्हणाली...

Kalyan News: कल्याणमध्ये मद्यधुंद तरुणाचा पोलिसावर हल्ला, काठीने जबर मारहाण; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Latest Marathi News Live Update : NEET आंदोलनावर पोलिसांच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव; RJD खासदार मनोज कुमार झा यांची याचिका

SCROLL FOR NEXT