पुणे

माउलींच्या मंदिरावर आज सुवर्ण कलशारोहण

CD

आळंदी, ता. १५ : संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त आळंदी देवस्थानकडून माउलींच्या संजीवन समाधी मंदिरावर बसविण्यात येणाऱ्या २२ किलो वजनाच्या सुवर्ण कलशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १५) दुपारी अडीच वाजता पूजन होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहे.
शुक्रवारी (ता. १५) दुपारी अडीच ते चार या वेळेत हा सोहळा होणार असून, या कार्यक्रमाची रूपरेषा देवस्थानकडून जाहीर करण्यात आली. दरम्यान, सुवर्णकलशासाठी विविध स्तरावरून देणगी देण्यात आली. कोणी आर्थिक तर कोणी सोन्याच्या रूपात मदत केली. त्यातून २२ किलोचा सुवर्ण कलश बनविला.
शुक्रवारी दुपारी अडीच वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सुवर्ण कलशाचे पूजन केले जाईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संत ज्ञानेश्‍वर महाराज समाधी मंदिराच्या मुख्य महाद्वाराच्या जीर्णोद्धाराचा कार्यारंभ केला जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सार्थ ज्ञानेश्‍वरी ऑडिओ बुकचे प्रकाशन कार्यक्रमाच्या निमित्ताने होणार आहे. सुवर्ण कलशारोहण वारकऱ्यांच्या हस्ते केले जाईल. त्यानंतर सायंकाळी माउलींचा मुकुट रथामध्ये ठेऊन प्रदक्षिणामार्गे रथोत्सव साजरा केला जाणार आहे.
दुपारी चार ते पाच प्रवचन, त्यानंतर साडेसहा ते साडेआठ कीर्तनाचा कार्यक्रम वीणा मंडपात होईल. रात्री दहा ते बारा वाजता परंपरेप्रमाणे गोकुळाष्टमी आणि माउली जन्मानिमित्त कीर्तन होईल. रात्री बारा वाजता माउलींची आरती झाल्यानंतर पुष्पवृष्टी आणि सुंठवडा वाटपाचा कार्यक्रम होईल. देवस्थानच्या वतीने मानकऱ्यांना नारळ प्रसाद दिला जाईल. परंपरेप्रमाणे गावकरी भजनाचा कार्यक्रम होईल. शनिवारी (ता. १६) सकाळी नऊ ते अकरा बापूसाहेब मोरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने जन्मोत्सव सोहळ्याची सांगता होईल.

मंदिरावर रोषणाई
माउली जन्मोत्सव आणि सुवर्ण कलशारोहणासाठी माउलींच्या समाधी मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भराव रस्ता आणि महाद्वारातही आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने परिसर उजळून निघाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT