आळंदी, ता. ६ : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत भरणाऱ्या कार्तिक वारीतील रथोत्सवासाठीच्या वापरण्यात येणारा लाकडी रथाच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या कार्यक्रमांना १२ नोव्हेंबर पासून सुरुवात होत असून ते १६ पर्यंत होत आहेत. शनिवारी (ता. १६) मुख्य कार्तिक एकादशीचा सोहळा असून रविवारी (ता. १६) द्वादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांचा कार्यक्रम आळंदीत आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा चांदीचा मुखवटा लाकडी रथामध्ये ठेवून तो रथ नगर प्रदर्शनासाठी निघतो. दरम्यान कार्तिक वारी अवघ्या आठवड्यावर येऊन ठेवली असल्याने देवस्थानच्या विविध कामाची लगबग सुरू झाली आहे. वारीच्या अनुषंगाने देवस्थानचे कर्मचारी लाकडी रथाची दुरुस्तीत करत आहेत. रथाला पॉलिशिंग तसेच चाकाची दुरुस्ती, एलईडी लाईटची चाचणी सध्या सुरू आहे. लवकरच हा लाकडी रथ वारीच्या रथोत्सव साठी सज्ज होणार आहे.