आळंदी, ता. ६ : आळंदी नगरपरिषद चौकातील इंद्रायणी नदीवरील अरुंद पुलावर वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने रिक्षा उभा केल्याप्रकरणी बुधवारी (ता. ५) आळंदी पोलिसांनी दोन रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. विजय कुमार हिरालाल लवटे (रा. माऊली पार्क वाघोली पुणे) आणि सुखदेव बाबूराव पाचंगे (रा. मोशी, ता. हवेली) या दोन रिक्षाचालकांवर आळंदी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत नर्मदा सुनील मिलखे आणि बाळू दैवान तोंडे या वाहतूक विभाग पोलिस कर्मचाऱ्यांनी फिर्याद दिली. लवटे हा त्याच्याकडील रिक्षा (क्र. एमएच १२ एक्सएन १२९२) आणि पाचंगे हा त्याच्याकडील रिक्षा (क्र. एमएच १२ एयू ६८६४) नगरपरिषद चौकातील इंद्रायणी नदीवरील पुलावर वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने थांबला होता.