पुणे

पार्लरला गेलेली मुलगी आळंदीतून बेपत्ता

CD

आळंदी, ता. २३ : मूळचे उत्तर प्रदेश मात्र सध्या धानोरे (ता. खेड) येथे राहत असलेली वीस वर्षीय तरुणी पार्लरला जाते, असे सांगून गेली होती. ती धानोरे येथून बेपत्ता झाली.
ही घटना धानोरे येथील एका पार्लरच्या ठिकाणाहून बुधवारी (ता. २१) सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली. याबाबत मुलीच्या वडिलांनी आळंदी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. बेपत्ता तरुणीचे कुटुंबीय मूळचे उत्तर प्रदेश येथील मूमदाबाद येथील असून सध्या धानोरे येथे एका फर्निचर कंपनीमध्ये काम करत आहेत. ही वीस वर्षीय तरुणी घरातून पार्लरमध्ये जात असल्याचे सांगून बेपत्ता झाली. अंगाने गोरी, सरळ नाक, उंची १६२ सेंटीमीटर, अंगावर निळा टॉप, निळा सलवार परिधान केला असून तिला हिंदी आणि मराठी भाषा येतात. आळंदी पोलिस बेपत्ता तरुणीचा शोध घेत असून संबंधित तरुणीबाबत माहिती मिळाल्यास आळंदी पोलिस ठाण्याची संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कागदपत्रे द्या किंवा जागा खाली करा...; एसआरएने धारावी पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना अंतिम नोटीस बजावली, किती दिवसांची?

मी त्याचा बाप आहे... व्हायरल व्हिडीओमुळे होणाऱ्या टीकेवरून आस्ताद काळेचे वडील संतापले; म्हणाले- माजोरडा आहे म्हणता मग...

25 मार्चपासून 'या' राशींचा गोल्डन टाईम सुरू ! राजासारखं जगणार आयुष्य ; पैसा, गाडी, करियर सगळ्यात होणार प्रगती

आधी तुकड्यांमध्ये शरीराचे अवयव, नंतर संपूर्ण सांगाड्यासारखे शरीर आढळले; महामार्गावर मुरूम टाकताना धक्कादायक प्रकार समोर

Gudi Padwa Special Sugar-Free Dates Shrikhand: गुढी पाडव्याला मधुमेहीदेखील खाऊ शकतील श्रीखंड; खजूर श्रीखंडाची रेसिपी लगेच वाचा

SCROLL FOR NEXT