पुणे

चऱ्होली खुर्द ग्रामपंचायतीने हलविला कचरा

CD

आळंदी, ता. २० : जळालेल्या कचऱ्यापासून होणाऱ्या धुराचे प्रदूषण उपद्रव टाळण्यासाठी चऱ्होली खुर्द ग्रामपंचायत मार्फत गायरानातील जळालेला कचरा जेसीबीच्या माध्यमातून हलवून एका खड्ड्यामध्ये जमा केला जात आहे. नव्याने येणारा कचरा हा गायरानातील अन्यत्र जागेत वर्गीकरण केला जाणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी बाळासाहेब बिंदले यांनी दिली.
बिंदले म्हणाले, ‘‘ग्रामपंचायत हद्दीत दिवसाला दीड टन कचरा तयार होतो. दरम्यान मागील काही दिवसात अज्ञात व्यक्तींनी कचरा डेपोला आग लावल्यामुळे संपूर्ण कचरा आगीच्या भक्ष्य स्थानी पडला. जळालेला कचरा धूपत असल्याने त्यातून धुरासारखे प्रदूषण येऊ लागले. प्रदूषणाचा उपद्रव नागरिकांना होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून जळालेला कचरा जेसीबी आणि पोकलेनच्या माध्यमातून उचलून अन्यथा जागेमध्ये हलवला जात आहे. गायरानात एका बाजूला खड्डा करून त्यामध्ये कचरा साठवला जात आहे. याचबरोबर अधून मधून टँकरने पाणी मारून कचरा डेपोतील आग आटोक्यात आणली जात आहे. ग्रामपंचायत हद्दीतून नवीन येणारा कचरा हा अन्यत्र गायरानात वेगळ्या ठिकाणी जमा केला जात आहे.’’
आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्या सोबत आळंदी नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन जागेमध्ये एकत्रित कचरा गोळा केला जावा आणि त्यावर प्रक्रिया केली जावी या संबंधात पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायत आर्थिक सक्षम नसल्याने घनकचरा व्यवस्थापन आळंदी नगरपरिषदेच्या माध्यमातून केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT