पुणे

आळंदीत थकबाकीदारांना १५ मार्चपर्यंत मुदत

CD

आळंदी, ता. २४ : आळंदी नगरपरिषद हद्दीमध्ये मिळकतकर थकबाकीदारांच्या कर वसुलीसाठी आता १५ मार्चपासून मिळकती सीलबंद करण्याची कारवाई, तसेच पाणीपट्टी थकविणाऱ्यांवरही नळजोड तोडण्याची कारवाई केली जाणार आहे. थकबाकी धारकांसाठी १५ मार्चपर्यंत अभय योजना नगरपरिषदेकडून राबवण्यात आली असून, यामध्ये केवळ ६७ थकबाकीदारांनीच लाभासाठी अर्ज केला आहे.
मार्च महिना कर वसुलीसाठी शेवटचा महिना असल्याने नगर परिषदेने कडक धोरण अवलंबले आहे. आळंदी नगरपरिषद हद्दीमध्ये ८१४९ मिळकती आहेत. यामध्ये १११० मिळकत धारक थकबाकीदार असून, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकीदार असलेले ४६ मिळकत धारक आहेत. तसेच, नगरपालिका मालकीच्या शॉपिंग सेंटर एक आणि दोनमध्ये एकूण ४२ गाळेधारक असून, त्यापैकी १७ गाळेधारक थकबाकीदार आहेत. त्यांची एकूण थकबाकी १० लाख ६२ हजार ६३६ रुपये आहे, तर गाळेधारकांमध्ये एक गाळाधारक दोन वर्षांपेक्षा अधिक काळ थकबाकीदार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना आळंदी नगरपरिषद कर निरीक्षक सीमा चारभाने यांनी सांगितले, आळंदी नगर परिषदेने १५ मार्चपर्यंत थकीत कर मिळकत धारकांसाठी थकीत करावरील व्याजावर सूट देण्यासाठी मुदत दिली आहे. मात्र, याला नगरपरिषद हद्दीमध्ये प्रतिसाद थंड आहे. १५ मार्चला अभय योजनेची मुदत संपत आहे. सद्यःस्थितीला अवघ्या ६७ लोकांनी लाभ घेतला आहे. आता सध्या एकूण १९ थकबाकीदारांना नोटीस दिल्या आहेत. नळ तोड किंवा जप्तीच्या कारवाईबाबत थकबाकीदारांवर कारवाईची पहिली प्रक्रिया म्हणून नोटिसा वाटप केल्या आहेत. पण कारवाई १५ मार्चपासून केली जाईल, तर आळंदी नगर परिषद पाणीपुरवठ्याबाबत दोन वर्षांपेक्षा अधिक थकबाकीदार असलेले केवळ सहा मिळकत धारक, तर पाणीपट्टीचे सरसकट थकबाकीदार १३९६ आहेत. आळंदी नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार एकूण नळजोड संख्या ३७७४, यामध्ये पाणीपट्टी कराची एकूण थकीत पाणीपट्टी कर ४ कोटी ३८ लाख ९५ हजार ९४८ रुपये असून, थकीत पाणी पट्टी कराची वसुली १ केटी ६९ लाख ७० हजार १८८ एवढी रुपये झाली. पाणीपट्टीमध्ये दोन लाखापेक्षा अधिक थकबाकीदार असलेले केवळ सहा मिळकत धारक आहेत.

थकबाकी वसुलीसाठी पालिकेची पुढील कारवाईसाठी खेड तसेच हवेली विभागाकरिता दोन स्वतंत्र वसुली पथके नियुक्त केली असून, घरोघरी जाऊन वसुली केली जात आहे. वॉलमन यांना पाणी सोडल्यानंतर त्या भागात लोकांना घरोघरी जाऊन पाणीपट्टी व घरपट्टी भरण्याबाबत सूचना करण्याचे आदेश दिले आहेत. थकबाकीदारांनी पाणी पट्टी न भरल्यास त्यांना नोटीस देण्यात येत आहे. नोटीस दिले नंतरही कर न भरल्यास त्यांचे नळ जोडणी खंडित करण्यात येतील व त्यांची नावे स्थानिक नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येतील.
- माधव खांडेकर, मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चिंता वाढवणारी बातमी! भारताचा स्टार फलंदाज तातडीने संघाची साथ सोडून घरी परतला; आज सरावालाही नाही आला, कारण...

‘सुपर डुपर’चे उत्सुकता वाढवणारे पोस्टर प्रदर्शित; 'या' तारखेला होणार सिनेमा रिलीज

T20 World Cup Tickets: उपांत्य फेरी, अंतिम फेरीच्या तिकिटांच्या विक्रीला सुरुवात; मुंबईत होणाऱ्या सामन्याचे तिकीट कुठे खरेदी कराल?

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा ‘तिघी’चा ट्रेलर प्रदर्शित

Latest Marathi News Live Update : बहिणीचं शीर धडावेगळं केलं, सख्ख्या भावाकडून निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT