आळंदी, ता. २६ : पीतांबर... भरजरी मेखला..... सोन्याचे छत्र चामर.... मोत्यांची आभूषणे..... अशा राजेशाही थाटात ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून चंदन उटीद्वारे शिंदेशाही रूप साकारण्यात आले. चंदनउटीतून माऊलींच्या समाधीवर साकारलेले शिंदेशाही राजबिंडे रूप लक्ष लक्ष नयनाने डोळ्यात साठवीत भाविकांनी रामनवमीच्या निमित्ताने दर्शन घेतले.
रामनवमीनिमित्त आज मंदिरात पहाटे चार वाजता घंटानाद, त्यानंतर काकडा आरती पवमानअभिषेक करण्यात आला. नंतर भाविकांचे समाधी दर्शन सुरू झाले. आज रामनवमी असल्याने सकाळी ११ ते दुपारी एकच्या दरम्यान वीणा मंडपात रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी आरती करण्यात आली आणि त्यानंतर सुंठवडा वाटण्यात आला तसेच मानकरांना नारळप्रसाद देण्यात आला. त्यानंतर दुपारी अडीच ते सहा दरम्यान माऊलींच्या समाधीवर चंदनउटीसाठी समाधी दर्शन बंद करण्यात आले. आळंदी देवस्थानच्या वतीने माऊलींच्या समाधीवर चंदनउटीतून शिंदेशाही अवतार साकारण्यात आला. सायंकाळी सहानंतर चंदनउटी अवतारातील दर्शन आणि पंखामंडपात चांदीच्या चलपादुकांचे दर्शन भाविकांसाठी ठेवण्यात आले. रामजन्म असल्याने राममंदिरातील रामाच्या पालखीचे सायंकाळी पाच ते सहा मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाली. यावेळी रात्री नऊ ते साडेबारा माऊलींची नित्याची गुरुवारची पालखी काढण्यात आली. पालखीचे मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर धुपारती शेजारती झाली आणि साडेबारानंतर जागरचा कार्यक्रम सुरू झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.