आळंदी, ता. १९ : शेतजमिनीतून रस्ता करण्यास विरोध केल्याने जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण करून शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची घटना धानोरे (ता. खेड) येथे घडली. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी सात जणांविरुद्ध शनिवारी (ता. १८) गुन्हा दाखल केला आहे.
अजित ज्ञानेश्वर काळजे (रा. चऱ्होली बुद्रुक, ता हेवली), सौरभ गणेश पाचपुते (रा. मरकळ), ऋषिकेश सुरेश कदम (रा. निरगुडी) यांच्यासह दोन अनोळखी पुरुष आणि दोन महिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत बबन शंकर गायकवाड (वय ६५, रा. विकासवाडी, धानोरे) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ते १५ एप्रिल दरम्यान आरोपींनी गायकवाड यांच्या शेतात जेसीबी नेऊन पिकांचे नुकसान व अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्यास विरोध केला असता, आरोपींनी बबन गायकवाड, त्यांच्या पत्नी बेबी आणि सून अश्विनी यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण व शिवीगाळ केली. या हल्ल्यात तिघेही जखमी झाले आहेत. आळंदी पोलिस अधिक तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.