आळेफाटा, ता. ११ : जाधववाडी (ता. जुन्नर) येथील श्री जगदंबा माध्यमिक विद्यालयात मॅजिक बस इंडिया फाउंडेशन आणि नेस्ले हेल्दी किड्स यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये सर्वप्रथम मॅजिक बसचे युवा मार्गदर्शक शुभम मिसाळ यांनी विद्यालयातील मुला-मुलींना शाश्वत विकास ध्येयांवर मार्गदर्शन केलं. त्यात गरीबी निर्मूलन, निरोगीपणा आणि क्षेमकुशल, उपासमारीचे समूळ उच्चाटन, गुणवत्तापूर्ण शिक्षण, लिंग समभाव, पर्यावरणाचे संरक्षण आदी विषयांचा समावेश होता. यानंतर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी या विषयांवर स्वतःचे विचार पोस्टर वरती लिहून सादरीकरण केले तसेच या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिनाच्या निमित्ताने विद्यालयातील मुलांना एक चांगला स्वयंसेवक म्हणून समाजात जगत असताना आपली स्वतःची जबाबदारी आणि कर्तव्य नेमकी कोणती आहेत, हे अतिशय सकारात्मकरित्या समजून सांगितले.
हा आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री जगदंबा विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष कसाळ, धनश्री सुर्वे आणि इतर शिक्षकांनी सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.