पुणे

धनधान्याची मुबलकता देणारे वर्ष

CD

आळेफाटा, ता. ३० : राजुरी येथे नवीन वर्षानिमित्ताने संपूर्ण वर्षांचे पाडवा पंचाग वाचन करण्यात आले आणि यंदाचा पाऊस हा परीट समाजाच्या घरी असल्याचे सांगण्यात आले.
सध्याच्या बदलत्या काळानुसार सहसा कोणी पंचाग पहात नाही मात्र राजुरी (ता. जुन्नर) हे गाव कित्येक वर्षांपासून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दरवर्षीप्रमाणे हनुमान देवस्थान ट्रस्ट आणि इतर देवस्थान ट्रस्टच्या चावडीवर संपूर्ण वर्षाचे पंचांग वाचन करण्यात येत असते. याहीवर्षी सकाळी नऊ वाजता गावचे शास्त्री भास्कर डुंबरे काका यांनी पाडवा पंचांग वाचन केले. त्यांनी आकड पूजा केल्यानंतर वाचन करताना सांगितले की यावर्षीचा पाऊस परीटाच्या घरी पाऊस होणार असून तो कमी पण चांगला होणार आहे. धनधान्य मुबलकता तसेच पशुपालकांना अनुकूल वातावरण राहणार असून दुग्धोत्पादन चांगले राहणार आहे. चांगला पाऊस होणार असल्याचे सांगितल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने समाधानाची गोष्ट असल्यामुळे तो आनंदी झाला आहे. तसेच यावर्षीचे प्रत्येक महिन्यातल्या नक्षत्राचे पंचांग वाचून माहिती देण्यात आली. याप्रसंगी माजी सभापती दीपक औटी, गावचे उपसरपंच ज्ञानेश्‍वर शेळके, हनुमान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मुरलीधर औटी, एम. डी. घंगाळे, बाळासाहेब हाडवळे, ममताराम हाडवळे, हनुमंत औटी, कॅ. महादेव हाडवळे, बबन घंगाळे, अनंतराव गटकळ, नामदेव औटी, रमेश औटी, तुकाराम डुंबरे, सुदामा औटी, ज्ञानेश्‍वर गटकळ, विजय ताजवे, संतोष गफले, रवी गाडगे आदी उपस्थित होते.
दीपक‌ औटी म्हणाले, ‘‘राजुरी गावात चावडीवर संपूर्ण वर्षाचे पंचाग वाचण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा सुरू आहे. ती आजही टिकून असल्याचा आनंद आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT