आळेफाटा, ता.११ : राजुरी (ता.जुन्नर) येथील स्वप्नील ममताराम हाडवळे याने नोकरीच्या मागे न लागता जैविक खतांच्या मात्रा देऊन वांग्याची शेती फुलवली. केवळ पाच तोड्यात दोन टन मालाचो उत्पादन मिळाले. केवळ पंचवीस गुंठ्यात कमी खर्चात अधिक नफा मिळविला आहे.
स्वप्नीलने जनावरांसाठी हत्ती गवत लावले होते. ते काढल्यानंतर हे शेत महिना भर तापत ठेवले. नंतर हे शेताला पाण्याची पाळी घातली व विशेष ठराविक अंतरावर ट्रॅक्टरच्या साह्याने सारे पाडले. दरम्यान, वांग्याची शेती फुलविण्यासाठी वडील ममताराम हाडवळे आई जयश्री व भाऊ संदीप यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे.
अशी केली लागवड
१.चिवचिव या वाणाची २५०० रोपे आणून दोन फुटांच्या अंतरावर लावली.
२. लावडीनंतर वेळच्यावेळी पाण्यातून जैविक खतांचा मात्रा दिली
३. योग्य प्रकारची औषध तसेच खते व फवारणी केली
४. पिकासाठी फक्त १५ ते २० हजार रुपये खर्च आला.
ऐंशी हजार रुपयांचा नफा मिळण्याचा विश्वास
सध्या एका किलोला १३ ते १५ रुपये बाजारभाव मिळत आहे. झालेला खर्च वजा जाता त्यांना आतापर्यंत सात ते आठ हजार रुपयांचा नफा झाला आहे. अजुन हे पाच ते सहा महिने चालणार असुन यामधून त्यांना यामधुन त्यांना साठ ते ऐंशी हजार रुपयांचा नफा अजुन मिळणार आहे.
चिवचिव वाणाच्या वांग्याचे पीक घेत असताना रासायनिक खतांचा वापर न करता फक्त शेणखत व जैविक खतांचा वापर केल्याने पीक चांगले बहरले. यामध्ये विशेष करून सोलर फळपोखरी नारीअळीचे ट्रॅप, चिकट सापळ्यांचा वापर व कीटकनाशक दशपर्णी अर्काचा वापर करण्यात आला. जैविक खते वापरल्याने माल चांगला निघत आहे
- स्वप्नील हाडवळे, वांगी उत्पादक
चार वर्षांत मिळालेला प्रतिकिलोचा कमाल बाजारभाव (रुपयांत)
२०२२........ ३०
२०२३........२५
२०२४........२५
२०२५........१५
06368
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.