पुणे

संतवाडी फाट्याजवळ कचऱ्याचे ढीग

CD

आळेफाटा, ता. २३ ः पुणे‌-नाशिक महामार्गावरील संतवाडी फाटा या ठिकाणी रस्त्याकडेला कचरा असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
पुणे-नाशिक या महामार्गावर असलेल्या आळेखिंड संतवाडी (ता. जुन्नर) फाट्याजवळ रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्यांसह घनकचरा टाकत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे महामार्गावर सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीतून बहुतांश वाहनचालकांना, तसेच स्थानिक नागरिकांना त्रास होत असल्याने या ठिकाणी नेमकं कचरा कोण टाकते? याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
दरम्यान, आळेफाटा हे पुणे-नाशिक व अहिल्यानगर-कल्याण या महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असून, बाजारपेठेची वाढ झाल्याने हॉटेल व्यावसायिक वाढले आहेत, त्याचप्रमाणे रहदारीचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, त्यानुसार कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सोय उपलब्ध नसल्याने रात्रीच्या वेळी अज्ञातांकडून महामार्गाच्या कडेला प्लॅस्टिकच्या पिशव्या, पोत्यांमध्ये बांधून कचरा टाकला जात आहे. त्यामुळे तो त्यातच कुजतो, सडतो आणि तेथेच साठून राहतो. त्याचे प्रमाण इतके जास्त आहे की, दिवसभरातच ढीग साठतात, तर बाजूला असलेल्या ओढ्यात मटण- चिकन व्यावसायिक रोजची घाण टाकत आहेत. तो तेथेच साचून राहतो. तेथेच तो कुजतो आणि परिसरात दुर्गंधी पसरते. अतिशय कुबट, सडलेल्या पदार्थाचा वास त्या भागातून जाणाऱ्या प्रवाशांनाही त्रासदायक ठरतो. तेथे राहणाऱ्यांसाठी तर तो कायमचा मनस्ताप ठरत आहे. संबंधित ग्रामपंचायतींना कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन करावे लागणार आहे. तरी रस्त्याकडेला सर्रासपणे कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई लवकरात लवकर करावी, अन्यथा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा संतवाडी येथील काळजी झाड फाउंडेशनच्या वतीने देण्यात आला आहे.

तहसीलदारांच्या इशाऱ्याकडे पाठ
संतवाडी गावातील ग्रामस्थ, तसेच काळजी झाड फाउंडेनशनचे पदाधिकारी आळेफाटा येथील चौकात १५ ऑगस्ट २०२४ रोजी उपोषणास बसले होते. या उपोषणाची दखल प्रांताधिकारी, तालुक्याचे तहसीलदार यांनी दखल घेतली होती. तेव्हा कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी दिला होता. त्यामुळे चार ते पाच महिने या ठिकाणी कचरा, घाण कोणीही टाकत नव्हते, परंतु गेल्या एक ते दीड महिन्यापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा साठत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT