आळेफाटा, ता. ३० : राजुरी (ता.जुन्नर) येथील महेश प्रभाकर औटी यांनी माळरानावरील १० गुंठ्यात बोरडो वाणाच्या गुलाबाची बाग फुलविले आहे. त्यांनी चार महिन्यांत दिवसाआड आतापर्यंत अडीच ते तीन हजार किलो फुलांची विक्री केली आहे. यातून त्यांनी आतापर्यंत खर्च वजा जाता तीन लाख रुपयांचा नफा मिळविला आहे.
महेश औटी यांचा वडिलोपार्जित पेढा बनवण्याचा व्यवसाय आहे. पण शेतीच्या करण्याच्या ध्यास घेऊन त्यांनी गुलाब शेती फुलविली आहे. गुलाबाच्या पिकापासून मागील सहा वर्षांपासून चांगले उत्पन्न मिळत असल्याने त्यांची घरी भरभराट वाढली आहे, अशी भावना औटी कुटुंबाकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, औटी यांना गुलाबाची शेती कसण्यासाठी पत्नी छाया हिची मोलाची साथ मिळाली आहे. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मुलगा प्रज्वल यास डॉक्टर बनवले आहे. तो सध्या सातारा (कऱ्हाड) येथे कार्यरत आहे.
कोणत्याही शुभ कार्यात देवासाठी तसेच मान्यवरांच्या सन्मानासाठी आपण नेहमी गुलाबाच्या फुलांचा वापर करत असतो. गुलाब हे व्यापार पिकातील फूल म्हणून ओळखले जाते. गुलाबाच्या शेतीतून मोठे आर्थिक गणित शेतकऱ्यांना मांडता येते. पण त्यासाठी योग्य नियोजनाची गरज लागते. सण, लग्न, यात्रा आदी काळांत २०० रुपये किलोप्रमाणे बाजारभाव मिळत आहे.
- महेश औटी, गुलाब उत्पादक
अशी केली लागवड
१. मशागतीसाठी १० गुंठे क्षेत्राची निवड
२. एक ट्रॉली शेणखत पांगवून जमीन तापविली
३. एक महिन्यानंतर सहा फुटाचे अंतर ठेवून बेड पाडले
४. दीड फुटांचे अंतर ठेवून बोरडो वाणाच्या १२०० रोपांची लागवड
५. बागेला ठिबक सिंचनची व्यवस्था केल्याने दिले वेळोवेळी औषधे व पाणी
६. बाग फुलविण्यासाठी केला ५० हजार रुपयांपर्यंत खर्च
मागील पाच वर्षातील किमान प्रतिकिलोचा बाजारभाव (रुपयांत)
२०२१..............१५०
२०२२..............१८०
२०२३..............१९०
२०२४..............२००
२०२५..............२२०
06561
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.