आळेफाटा, ता. १ : आळेफाटा येथील बाजारात रविवारी (ता. २९) डाळिंबाच्या २० किलोच्या एका क्रेटला प्रतवारी नुसार ७ हजार रुपयांचा उच्चांकी बाजारभाव मिळाला, अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने दिली. बाजारात २३५१ विक्रमी क्रेटची आवक झाली होती.
बाजारात दोन नंबर डाळिंबाच्या क्रेटला चार हजार रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे. तीन नंबरला एक हजार ५०० तर चार नंबरच्या एका वीस किलोच्या क्रेट ला ५०० रुपयांचा बाजारभाव मिळाला.तसेच
दरम्यान, आळेफाटा येथील या बाजार समितीत पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शिरूर, अहिल्यानगर येथून शेतकरी डाळिंब विक्रीसाठी येत आहेत. पुणे आणि नगर जिल्ह्यासाठी ही महत्त्वाची बाजार पेठ असून, रविवारी झालेल्या मोंढयात चांगला बाजार मिळाला आहे अशी माहिती डाळिंब आडतदारांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.