पुणे

कारखान्याचे काम सुरू केल्यास आंदोलन

CD

आळेफाटा, ता.२ : राजुरी (ता.जुन्नर) येथील दावलमालिक परिसरात उभारला जात असलेल्या जुन्नर शुगर लिमिटेड या खासगी साखर कारखान्यास शेतकरी, ग्रामस्थांनी विरोध केला आहे.

कारखान्यास विरोध दर्शविण्यासाठी राजुरीकरांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके जिल्हाधिकारी प्रांत कार्यालय तहसील कार्यालय महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळास राजुरी ग्रामपंचायतीने पत्र दिले आहे. साखर कारखान्याचे काम सुरू केल्या तीव्र आंदोलन सुरू केली आहे, असा इशारा ग्रामस्थांतर्फे देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कारखान्यासाठी जागा मोकळी करणे, झाडे तोडणे ही कामे सध्या सुरू आहेत. लवकरच साखर कारखाना सुरू होणार आहे. संबंधित साखर कारखान्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यात धोका निर्माण होणार आहे. त्यापासून त्यापासून होणारे वायू, जल तसेच ध्वनी प्रदूषणामुळे शेती धोक्यात येणार आहे. नियोजित साखर कारखान्यालगत वन खात्याचे मोठे जंगल आहे. त्यामुळे वन्यप्राणी, पक्षी यांना मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते तसेच या ठिकाणी जी.एम.आर.टी. सॅटेलाइट अँटिना असल्यामुळे जीएमआरटी यांना अडथळा निर्माण होऊ शकतो. तसेच येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनाही त्रास होण्याची शक्यता आहे. कारखान्याच्या समोरील बाजूस डोंगररांगा आहेत त्यामुळे पश्चिमेकडून येणारा वाऱ्यामुळे आजूबाजूच्या परिसरात कारखान्याच्या निघणाऱ्या वायू अथवा धरामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होऊ नागरिकांच्या आरोग्यास हानी होऊ शकेल त्यामुळे संबंधित क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी पत्राद्वारे खासदार, आमदार यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, कारखाना प्रशासनाशी संपर्क साधला तो होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT