पुणे

बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

CD

आळेफाटा, ता. १३ : राजुरी (ता. जुन्नर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाल्याची घटना शनिवारी (ता. १२) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राजुरी येथील हातवळण मळ्यात राहत असलेले शब्बीर महालदार यांचा शेळीपालनाचा व्यवसाय आहे. त्यांनी शनिवारी नेहमीप्रमाणे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शेळ्या गोठ्यात बांधली. त्यानंतर अर्धा तासातच बिबट्याने गोठ्यात प्रवेश करत एका आठ महिन्यांच्या शेळीवर हल्ला केला. त्या शेळीला घेऊन जात असताना इतर शेळ्या मोठ्याने ओरडल्याने महालदार गोठ्याकडे गेले असता त्यांना बिबट्याने शेळीवर हल्ला केल्याचे दिसले. बिबट्याने त्या ठिकाणाहून पळ काढला, परंतु हल्ल्यात शेळी मृत्युमुखी पडली. घटनास्थळी वनविभागाच्या वतीने पंचनामा केला आहे.
दरम्यान, परिसरात दिवसेंदिवस बिबट्याचे पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढतच चालले आहेत. बिबट्याने १५ दिवसांपूर्वी याच शेतकऱ्याच्या एका बोकडावर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी पुन्हा एक शेळी ठार केली आहे. त्यामुळे या ठिकाणी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी उपसरपंच माउऊ शेळके व मुसलमान जमात राजुरीचे सदर शाकीर चौगुले यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

Fuel Price Hike India : पेट्रोल-डिझेल प्रति लिटर 4 ते 5 रुपये, तर एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागणार? पुढील 5 ते 7 दिवसांत सरकार घेणार निर्णय!

SCROLL FOR NEXT