पुणे

डॉ. बोरकर यांची व्याख्यातापदी निवड

CD

आळेफाटा, ता. ३ : आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानेश्‍वरी ग्रामोन्नती मंडळ संचलित बाळासाहेब जाधव महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख, प्रसिद्ध कवी व व्याख्याते प्राध्यापक डॉ. केशव बोरकर यांची नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळ या विभागामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या व्याख्यान मालांसाठी ‘वक्ता’ आणि ‘ग्रंथअन्वेषक’ या दोन पदांसाठी विद्यापीठामार्फत अधिकृतपणे निवड झाली. यामुळे पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयांमध्ये वक्ता म्हणून व्याख्याने देण्याची व विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी त्यांना लाभणार आहे.
प्रा. बोरकर यांनी इंग्रजी भाषा व साहित्य या विषयात पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी प्राप्त केलेली असून गेली ३१ वर्षे ते पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषा व साहित्याचे अध्यापन करीत आहेत. पुणे विद्यापीठाचे ते मान्यता प्राप्त पीएचडी संशोधन मार्गदर्शक म्हणूनही काम करतात. सरांनी त्यांच्या स्वतःच्या लेखणशैलीतून ‘ग्रीष्मांत’ (कवितासंग्रह) आणि ‘जीवन त्यांना कळले हो’ (चारोळी संग्रह) ही दोन पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. तसेच त्यांनी आत्तापर्यंत पुणे, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये विविध विषयांवर व्याख्याने दिली आहेत.
या निवडीमुळे त्यांनी आता ‘सर्जनशीलता’, ‘कला काव्यलेखनाची’, ‘बोलावे कसे, वागावे कसे व जगावे कसे’, ‘रानकवीच्या रानातल्या कविता’, ‘वारकरी संप्रदायाचा इतिहास’ आणि ‘ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी’ यासारखे प्रमुख विषय व्याख्यानासाठी निवडले आहेत. प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव, मंडळाचे अध्यक्ष अजय कुऱ्हाडे, बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष सौरभ डोके, डॉ. अर्जुन पाडेकर, अरुण हुलवळे, किशोर कुऱ्हाडे, भाऊ कुऱ्हाडे, बबन सहाणे, उल्हास सहाणे, बाबू कुऱ्हाडे, शिवाजी गुंजाळ, जीवन शिंदे, दिनेश सहाणे, कैलास शेळके, प्रदिप गुंजाळ, देविदास पाडेकर, सम्राट कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे, शांताराम कुऱ्हाडे व सर्व संचालक मंडळाने त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking! CM On Mahadevi Elephant : मंत्रालयात बैठकीत मुख्यमंत्र्यांचा शब्द, राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात होणार पक्षकार

अजितदादांच्या जिल्हाध्यक्षांचा 'कार'नामा आला समोर; आमदार नसतानाही गाडीवर लावला 'आमदार लोगो', प्रशासनाकडून कारवाई होणार?

Education News: राज्यातील २१ लाखांहून अधिक अकरावीच्या जागांपैकी ८.८२ लाख प्रवेश निश्चित; खुल्या फेरीकरिता आजच भरा अर्ज

Video Viral: नागपूर फ्रेंडशिप डे पार्टीत राडा... आयोजकाची पोलिसांना थेट बावनकुळेंच्या नावाने धमकी, पोलिस प्रशासन कोण चालवतंय?

' तू माझी ताकद आहेस...' रितेशची जेनिलियासाठी खास पोस्ट, म्हणाला...'बायको, मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो'

SCROLL FOR NEXT