पुणे

सोयाबीन पीक पाण्याअभावी करपले

CD

आळेफाटा, ता. ५ : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिली आहे. सोयाबीन पीक पाण्याअभावी करपू लागले आहे. यामुळे उत्पादनात घट होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
यावर्षी सोयाबीन पेरणी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाली होती. तालुक्याच्या पूर्व भागातील आळेफाटा, राजुरी, कोळवाडी, संतवाणी, उंचखडक, आळे, वडगाव आनंद, साळवाडी, जाधववाडी, वडगाव कांदळी, वडगाव आनंद, नगदवाडी, साळवाडी,या परिसरात सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. आठवड्याभरात पाऊस झाला नाही तर सोयाबीन पूर्णपणे जळून जाणार आहे. पाऊस झाला तरीही उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येणार असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
दरम्यान, यंदा सोयाबीन जोमदार होते. पाऊसही भरपूर पडला होता. विहिरीमध्ये पाणी आहे. परंतु शेतीला फक्त आठ तास वीज असल्याने संपूर्ण क्षेत्र ओलित होऊ शकणार नाही. मोठ्या प्रमाणात कोरडवाहू क्षेत्रात सोयाबीन पीक घेतले जाते. गेल्या महिनाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

केंद्र सरकारने गेल्या वर्षी सोयाबीन पिकासाठी चार हजार ६०० तर चालू वर्षी चार हजार ८९२ रुपये हमीभाव घोषित केला आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र सोयाबीनची खरेदी ही चार हजार ते चार हजार ५०० या दराने होत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

सरसकट पीकविमा मिळण्याची मागणी
शासनाने हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची विक्री होणार नाही, याची काळजी घेऊन हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे. पाऊस वेळेवर न झाल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे त्यांना सरसकट पीकविमा मिळण्याची मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.

यंदा लवकर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी लवकर सोयाबीन पेरणी केली. महिनाभरापूर्वी पीक चांगले होते. मात्र, पावसाने गेल्या उघडीप दिल्याने सोयाबीन करपू लागले आहे. पाऊस पडला नाही तर उत्पादनात मोठी घट होणार आहे. याचा आमच्या वर्षभरावरील उत्पन्नावर परिणाम होईल.
- गणेश हाडवळे, सोयाबीन उत्पादक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ODI World Cup 2025 Live Streaming: भारतात सुरू होतोय १२ वर्षांनंतर वर्ल्ड कपचा थरार! कुठे पाहाणार सामने? जाणून घ्या एका क्लिकवर

Nilesh Ghaiwal : निलेश घायवळ स्विर्झलंडमध्ये; ९० दिवसांचा मिळवला व्हिसा

lioness guard VIDEO : नवरात्रोत्सवात देवीच्या मंदिरासमोर चक्क सिंहिणीचा पहारा!

IND vs WI: भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विंडीजला आणखी दुसरा मोठा धक्का; टीममध्ये केला बदल

२ तारखेला सोलापूर शहरातील वाहतूक मार्गात बदल! विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनी पारंपारिक वाद्याच्या गजरात निघणार मिरवणुका; ‘डीजे’ला बंदी, पोलिस आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT