आळेफाटा, ता. १० ः आळेफाटा (ता. जुन्नर) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. ९) झालेल्या गाईंच्या बाजारात २९१ गाईंची विक्री होऊन ६५ लाख रुपयांची उलाढाल झाली.
आळेफाटा येथील बाजार समितीत भरत असलेला गाई बाजार हा पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा बाजार भरत असून, येथील बाजारात पुणे, नाशिक, संगमनेर, अहिल्यानगर, शिरूर, आंबेगाव, ठाणे तसेच इतर ठिकाणाहून संकरित दुधाळ जातीच्या गाया विक्रीसाठी येत असतात. या आठवड्यात भरलेल्या बाजारात ३५३ संकरित गाया विक्रीसाठी आल्या होत्या. यामध्ये पाच हजारांपासून ७० हजार रुपयांपर्यंत गाई विकल्या गेल्या आहेत.
07167