पुणे

कोळवाडी येथे बछड्याचा मृत्यू

CD

आळेफाटा, ता. १ ः कोळवाडी (ता. जुन्नर) येथील उकळी मळ्यातील सुरेश रभाजी डावखर यांच्या विहिरीत बछडा मृतावस्थेत सापडला आहे.
डावखर हे रविवारी (ता. ३०) सायंकाळच्या सुमारास विहिरीकडे विद्युत पंप चालू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीमधून घाण वास येत होता. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना विहिरीमध्ये अंदाजे चार ते पाच महिन्यांचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती वन अधिकाऱ्यांना दिली. घटनास्थळी वनपाल अनिल सोनवणे, वनरक्षक कैलास भालेराव यांनी भेट देऊन मृत बछड्याला पाण्याच्या बाहेर काढून शवविच्छेदनासाठी आळे येथील वनविभागाच्या कार्यालयात नेले.
दरम्यान, या ठिकाणी सापडलेला बछडा हा अन्न- पाण्याच्या शोधात फिरताना अंदाजे चार ते पाच दिवसांपूर्वी पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती वनपाल अनिल सोनवणे यांनी दिली. तसेच, याच परिसरात काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याच्या शेतात एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता. तसेच, येथील नागरिकांना दररोज बिबट्याचे दर्शन होत असल्याने या ठिकाणी वन विभागाने पिंजऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Death News LIVE Updates: अजित दादा गेले… पण शेवटच्या क्षणापर्यंत कामात गुंतलेला माणूस, अपघात झालेल्या ठिकाणी कागदपत्रे-फाईल्स विखुरलेल्या अवस्थेत

Ajit Pawar Death : महाराष्ट्रासाठी काम करणारा एक चांगला नेता गमावला... ! सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे यांनी वाहिली श्रद्धांजली

Ajit Pawar Plane Crash: ''हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं'', प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव

Ajit Pawar Death: अजित पवारच नाही, तर देशातील 'या' नेत्यांनीही विमान अपघातात गमावलाय जीव...

अजितदादांचं जाणं अविश्वसनिय! दमदार आणि दिलदार मित्र गमावल्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची भावना

SCROLL FOR NEXT