आळेफाटा, ता. १४ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे राष्ट्रीय सेवा योजना, समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट बेल्हे, समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, समर्थ लॉ कॉलेज, समर्थ इन्स्टिट्यूट फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे यांच्यावतीने ‘शाश्वत विकासासाठी युवक, पाणलोट आणि पडीक जमीन व्यवस्थापन’ या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर राजुरी (ता. जुन्नर) येथे झाले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून गावाचा शाश्वत विकास करण्यासाठी या शिबिरात ‘शाश्वत विकासासाठी युवक, पाणलोट आणि पडीक जमीन व्यवस्थापन’ या उपक्रमाअंतर्गत डिजिटल लिटरसी, रस्ता सुरक्षा व पर्यटन विकास, नव मतदार जनजागृती नोंदणी व सर्वे, महिला सक्षमीकरण मेळावा, आरोग्य जागर, पर्यावरण संवर्धन, ग्राम सर्वेक्षण, ई-पीक पाहणी, आधार कार्ड व मतदार नोंदणी व जनजागृत, ई रेशन कार्ड, अन्नसुरक्षा व्याख्याने, नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर अशा अनेकविध उपक्रमांचा समावेश केला होता.
डोबी-डुंबरपट्टा या ठिकाणी ओढ्यावर १७५ गोणी एकावर एक थर रचून राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांना मार्फत वनराई बंधारे निर्मिती करण्यात आली.
डॉ. चंद्रशेखर वलव्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र तपासणी शिबिरात एकूण ६७६ रुग्णांची नेत्र तपासणी केली.
राजुरी व परिसरातील व्यक्तींसाठी ज्येष्ठ नागरिक कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी तब्बल १३६७ ज्येष्ठ नागरिक कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
या सात दिवसांमध्ये डॉ. रमेश खरमाळे, जी. के. औटी, प्रसाद झावरे, मनोज हाडवळे, नीलेश महाराज कोरडे, सचिन भोजने यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मानवी जीवनावरील पर्यावरणाचा प्रभाव, पाणलोट व्यवस्थापन, सायबर सेक्युरिटी, ग्रामीण उद्योजकता आदी विषयांवर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन केले होते. ‘प्लास्टिक मुक्त भारत’ या योजनेअंतर्गत खबडी या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा आणि प्लास्टिक एकत्र गोळा करून त्याचे दहन केले.
या राष्ट्रीय सेवा योजनेच्या हिवाळी शिबिरामध्ये एकूण २७५ विद्यार्थी सहभागी झाले होते. संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. भूषण दिघे, प्रा. दिनेश जाधव, प्रा. गणेश बोरचटे, प्रा. अश्विनी खटींग, प्रा. कल्याणी शेलार, डॉ. सचिन भालेकर, प्रा. अजय भागवत, डॉ. शरद पारखे, प्रा. प्रदिप गाडेकर आदींनी शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.