पुणे

छत्रपती शिवराय अभिवादन यात्रा

CD

आळेफाटा, ता. २३ ः आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ संचलित बाळासाहेब जाधव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी येथे ‘छत्रपती शिवराय अभिवादन यात्रा’ उत्साहात पार पडली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या यात्रेचे आयोजन केले होते.
या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. जयसिंग गाडेकर, प्रा. विकास पुंडे, प्रा. सोनल घोडेकर आणि प्रा. अरविंद कुटे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ५० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळाला अभिवादन केले. तसेच, राजमाता जिजाऊ आणि बाल शिवरायांच्या स्मृतींना वंदन केले.
यावेळी प्रा. डॉ. जयसिंग गाडेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याची महती सांगणारी शिववंदना सादर केली. विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक स्थळाची स्वच्छता राखण्याचा संकल्प करत किल्ल्यावर विखुरलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या व इतर कचरा गोळा करून कचराकुंड्यांमध्ये टाकला. शिवजयंती नियोजन समितीतर्फे आरोग्य पथकाच्या माध्यमातून प्रथमोपचार, वाहतूक आणि पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात आल्यामुळे उत्सव सुरक्षित व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले. अभिवादन यात्रेमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी अभिमानाची भावना आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

07791

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

खट्याळ, बिनधास्त आणि गप्पिष्ट बाईची मजेशीर दुनिया; कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत यांच्या ‘भागूबाई’चा ट्रेलर प्रदर्शित

Latest Marathi News Live Update: मुंबईत गांजा विकणाऱ्या दोन आरोपींना अटक

सतीश राजवाडे आणि ये रिश्ता फेम अभिनेत्रीचा रंगभूमीवर कमबॅक; नाटकाचं नाव आणि शुभारंभाची तारीख जाहीर

SCROLL FOR NEXT