आळेफाटा, ता. २७ : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील उपबाजारात गुरुवारी झालेल्या लिलावात ४३२ गाईंची विक्री झाली. संकरित जातीच्या गाईंना त्यांच्या प्रतवारीनुसार ५ हजारांपासून ९० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाल्याची माहिती सभापती संजय काळे यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील चाकणनंतरचा मोठा समजला जाणारा हा बाजार दर गुरुवारी भरतो. या बाजारात अहिल्यानगर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून शेतकरी खरेदी-विक्रीसाठी येतात. गुरुवारी विक्रीसाठी आलेल्या ४५० गाईंपैकी ४३२ गाईंचा व्यवहार पूर्ण झाला.
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी, आळे, वडगाव आनंद यांसह विविध गावांतील शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाला प्राधान्य दिले असून, अनेकांकडे शंभरहून अधिक गाईंचे गोठे आहेत. सध्या दुधाचे दर जेमतेम आणि पशुखाद्याचे भाव वाढलेले असले, तरी शेतीसाठी मिळणारे खत आणि गोमूत्र यामुळे शेतकरी या व्यवसायाकडे वळले आहेत. यंदा पाऊस चांगला झाल्याने हिरवा चारा मुबलक उपलब्ध आहे, परिणामी गाईंना मोठी मागणी असल्याचे माजी उपसभापती प्रितम काळे, सचिव रुपेश कवडे व कार्यालय व्यवस्थापक सतीष म्हस्करे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.