पुणे

राजुरीत रंगला कुत्यांचा आखाडा

CD

आळेफाटा, ता. १६ : राजुरी (ता. जुन्नर) येथील श्री खंडेराय भैरवनाथ यात्रोत्सवानिमित्त आयोजित कुस्त्यांच्या जंगी आखाड्यात महाराष्ट्रासह हरियाणातील पहिलवानांनी शड्डू ठोकला. आखाड्यात १५० हून अधिक झालेल्या कुस्त्यांना दोन लाख रुपयांच्या रोख बक्षिसांचे वाटप करण्यात आले.
या आखाड्यातील मुख्य लढत पहिलवान अनिल लोणारी (शेगाव) पहिलवान विकास कुमार (हरियाणा) यांच्यात झाली. ही कुस्ती बरोबरीत सुटल्याने दोघांनाही विभागून बक्षीस देण्यात आले. पहिलवान नवनाथ चोहे व पहिलवान आकाश चव्हाण यांना मानाचे चांदीचे कडे, तर शिवा उचळे याने मानाची ढाल व रोख रक्कम पटकावली. मुलींच्या कुस्त्यांनीही प्रेक्षकांची मने जिंकली.
देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब औटी, अभिनेते अविनाश पाटील आवटे व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. आखाड्यासाठी अविनाश औटी यांनी २५ हजार रुपये, तर अशोकराव आवटी यांनी चांदीची गदा व किरण व बाळासाहेब औटी यांनी चांदीचे कडे दिले. एच. पी. नरसोडे, बाळासाहेब कुऱ्हाडे व प्रकाश जोंधळे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘समर्थ’ची भरारी; सर्व १४ जागांवर आघाडीचे उमेदवार विजयी

बापरे, ही भेंडी आहे की सोनं? अमेरिकेत ७,२०० रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या भेंडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

Latest Marathi News Live Update : राज्यपाल डॉ. हरी बाबू कंभमपती यांनी पवित्र स्नान आणि महायज्ञात सहभाग घेतला

Raksha Khadse News: वादळाचा कहर! केळीच्या बागा उद्धवस्त! खडसे शेतात गेल्या अन्..

Kannad News : भोकनगावात २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन संपविले जीवन; चिमुकलीच्या रडण्यामुळे घटना आली उघडकीस

SCROLL FOR NEXT