पुणे

रानमळ्यात चोरट्यांकडून सोने, रोख रक्कम लंपास

CD

आळेफाटा, ता. १६ : रानमळा (ता. जुन्नर) येथे चोरट्यांनी पाच घरे फोडली. त्यातील एका घरातील जिजाबाई गबाजी गुंजाळ (वय ८५) यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. तिचे अर्धा तोळे सोन्याचे दागिने व तीन हजार रुपयांची रोख रक्कम लुटून नेली.
याबाबत आळेफाटा पोलिस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, रानमळा (ता.जुन्नर) येथील ढोली मळ्यात राहत असलेल्या जिजाबाई गुंजाळ (वय ८५) या एकट्या घरात राहतात. चोरट्यांनी गुरुवारी (ता.१६) पहाटे जिजाबाई यांच्या गळा तसेच कानातील दागिने तसेच कपाटातील तीन हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. त्यांना लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाणही केली.
दरम्यान, कुसुम शिवाजी गुंजाळ यांच्या घराची कौले काढून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी कपाटाचे कुलूप तोडत असताना घरातील लोकांना जाग आली. त्यांनी आरडाओरडा केल्याने चोरट्यांनी पळ काढला. पाबळे मळ्यात राहत असलेले शिवाजी धोंडिबा पाबळे, ज्ञानेश्वर तान्हाजी पाबळे, पंढरी नाना गुंजाळ यांच्याही बंद घरांचे कुलूप तोडून घरातील कपाटे चोरट्यांनी फोडली.
जबर मारहाण केलेल्या गुंजाळ यांच्यावर आळेफाटा येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांनी येऊन पंचनामा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

Satara Fraud: सातारा लघुपाटबंधारे विभागातील मोठा गैरप्रकार उघड; २८ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, दोन ठेकेदारांवर गुन्‍हा

Mumbai Rain News : मुंबईत पहिल्याच पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबले, लोकल सेवेवर परिणाम; पुढील काही तास धोक्याचे, हवामान विभागाचा इशारा

Latest Marathi News Live Update : पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! सायन सबवेमध्ये गुडघाभर पाणी, वाहतूक ठप्प; वाहनधारकांची तारांबळ

महिलांचे महिला व बालविकास कार्यालयात हेलपाटे! मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या बहिणीं’ना दरमहा लाभ नाहीच; २१ वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना करता येईना अर्ज

SCROLL FOR NEXT