बेल्हे, ता. २४ : वडगाव- कांदळी (ता. जुन्नर) येथील धर्माजी बाळाजी फुलसुंदर (वय ७६ ) यांचे नुकतेच निधन झाले. ते विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक होते.
वडगाव-कांदळी परिसरातील धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता. येथील श्री बिरोबा महाराज सहकारी दूध संस्था स्थापन करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. तसेच गावातील विविध सहकारी संस्थांमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. मुंबई दूरदर्शन केंद्राचे माजी सहसंचालक शिवाजी फुलसुंदर हे त्यांचे बंधू होत. तर आळेफाटा येथील सावतामाळी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक शरद फुलसुंदर हे त्यांचे सुपुत्र होत.
02318
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.