पुणे

मीना कालव्याच्या आवर्तन पूर्व बैठकीस प्रतिसाद

CD

बेल्हे, ता. ११ : पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) येथे मीना शाखा कालव्याचा रब्बी हंगाम २०२४-२५ आवर्तन पूर्व आढावा बैठक, नुकतीच घोड-कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीचे सदस्य व मीना शाखा कालवा समितीचे अध्यक्ष प्रकाश वायसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
पारगाव तर्फे आळे येथे झालेल्या बैठकीमध्ये पाणी वापर संस्था सक्षमीकरणासाठी आवश्यक बाबी, रब्बी हंगामातील पाण्याचे नियोजन करणे, पाणी वापर संस्थांनी सीसीएच्या प्रमाणात मागणी क्षेत्र देणे, सक्षम सचिवाची नेमणूक करणे, वितरिकास्तरीय संस्था तयार करणे, संस्थांचे ऑडिट, अनुदान आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी आर. जी. हांडे, जांबुत शाखा अधिकारी एस. टी. दाते, टाकळी हाजी शाखा अधिकारी पी. व्ही. पाटील, शिरोली शाखा अधिकारी ए. एल. कुमावत आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच मीना शाखा कालव्यावरील पाटबंधारे विभागाचे सर्व कर्मचारी संस्थांचे पदाधिकारी व सभासद शेतकरी उपस्थित होते.
यावेळी मीना शाखा कालव्यावरील अडचणी सोडवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. आवश्यकता भासेल तेव्हा सर्वजण सोबत रहा, मीना शाखा कालवा हा एक मॉडेल कालवा बनवू असे मत प्रकाश वायसे यांनी व्यक्त केले. यावेळी ज्ञानेश्‍वर उंडे, इंद्रभान गायकवाड, धोंडिभाऊ भोर, विश्‍वनाथ येवले, संपतराव पानमन, अंकुश घोडे आदींनी पाणी वापर संस्थांना येणाऱ्या अडचणी विषयी समस्या मांडल्या. प्रास्ताविक सुभाष झिंजाड यांनी, तर आभार पांडुरंग डुकरे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Income Tax: 1 एप्रिलपासून नवा Income Tax नियम! पगार, घर-गाडी, गिफ्ट, PF वर आता आकारला जाणार कर; जाणून घ्या 7 मोठे बदल

Latest Marathi News Live Update : झोजी ला खिंडीत जोरदार हिमवृष्टी

Tejaswini Sangale Death : सुवर्णपदक विजेती खेळाडू मृत्यूशी झुंज हारली! राष्ट्रीय खो-खो पटू तेजस्विनी सनगलेचे वयाच्या 18 व्या वर्षी निधन, अपघातात मेंदूला...

Solapur LPG Misuse: साेलापूरात घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे; अन्नधान्य वितरण विभागाचे छापे, हॉटेल व्यावसायिक रडारवर!

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

SCROLL FOR NEXT