पुणे

पारगावतर्फे आळे येथील रवीना डुकरे फौजदारपदी

CD

बेल्हे, ता. ३ : पारगावतर्फे आळे (ता. जुन्नर) येथील शेतकरी कुटुंबातील रवीना बाळासाहेब डुकरे हिने नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.         
रविना डुकरे हिने पारगावतर्फे आळे येथील महात्मा गांधी विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून शिरूरच्या विद्याधाम प्रशालेत अकरावी व बारावीचे शिक्षण घेतले. पारगावतर्फे आळे येथे पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालत गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने तिची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. येथील महात्मा गांधी विद्यालयात ग्रामस्थांच्या वतीने तिचा निवडीबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिरूरच्या विद्याधाम प्रशालेचे प्राचार्य वसंत सुकाळे, उद्योजक संभाजी चव्हाण, देवराम तट्टू, पारगावचे उपसरपंच रामचंद्र डुकरे, गोपाल कृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, विकास सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत तट्टू, बेल्हे येथील साईकृपा  पतसंस्थेचे अध्यक्ष सदाशिव बोरचटे, उपाध्यक्ष सावकार पिंगट, सामाजिक कार्यकर्ते जानकू डावखर, मंगरूळ गावचे सामाजिक कार्यकर्ते नीलेश लामखडे, पिंपरखेड गावचे  दयानंद ढोमे आदी उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी विद्यालयातील इयत्ता आठवीमध्ये शिकत असणाऱ्या वेदिका कैलास डुकरे व वेदांती येवले या दोन विद्यार्थिनींचा एनएमएमएस परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीस पात्र ठरल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar MP Accident : खासदार हेमंत सावरा भीषण अपघातातून थोडक्यात बचावले, डंपरने गाडीला धडक दिली अन्...

IPL 2026, RR vs DC: अडखळलेल्या दिल्लीला स्टार्कच्या पुनरागमनाचा दिलासा; आज राजस्थानशी लढणार; पाहा कशी असेल Playing XI

चाहत्यांना कसा वाटला 'राजा शिवाजी' सिनेमा? एक्सवर पोस्ट करत नेटकरी म्हणाले...'फुल पैसा वसूल'

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र देशात अव्वल!

Gold Silver Rates : सोने दरात किरकोळ तर चांदीच्या दरात सलग तीन दिवस मोठी घसरण; आजचा भाव किती?

SCROLL FOR NEXT