

RR vs DC | IPL 2026
Sakal
आयपीएलच्या यंदाच्या मोसमाचा आता उत्तरार्ध सुरू आहे. त्यामुळे साहजिकच प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी रस्सीखेच करावी लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली कॅपिटल्स-राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये आज जयपूरमध्ये लढत रंगणार आहे.
डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याचे दिल्ली संघामध्ये पुनरागमन होणार आहे. आठ सामन्यांमधून फक्त तीन सामन्यांत विजय मिळवणाऱ्या दिल्ली संघासाठी ही दिलासादायक बातमी असणार आहे; मात्र सहा सामन्यांत विजय साकारणाऱ्या राजस्थानचे आव्हान परतवून लावण्यासाठी दिल्लीला सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.