पुणे

निमगाव सावात बिबट्याच्या हल्ल्यात तिघे जखमी

CD

बेल्हे, ता. १९ : निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे सोमवारी (ता. १९) मध्यरात्रीच्या सुमारास, बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ कुटुंबातील तिघेजण जखमी झाले. दरम्यान येथील एका शेतकऱ्याच्या शेतात संबंधित मेंढपाळ कुटुंबाने मेंढ्यांच्या वाडा लावलेला होता.
याबाबत समजलेल्या माहितीनुसार, निमगाव सावा येथील घोडेमळा शिवारातील आंबापट्टी परिसरात जिजाभाऊ थोरात यांच्या शेतामध्ये मेंढपाळ कुटुंबाने मेंढ्यांचा वाडा बसवला होता. दरम्यान, मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास बिबट्याने मेंढ्यांवर हल्ला करायचा प्रयत्न केला. यावेळी मेंढरांच्या ओरडण्याच्या आवाजाने मेंढपाळ अंकुश लक्ष्मण बिचुकले यांना जाग आली. त्यांनी वाघूर लावलेल्या वाड्यात घुसून बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या डाव्या पायाला चावा घेतला. यावेळी त्यांच्या मदतीला धावलेली त्यांची पत्नी मीरा ही बिबट्याच्या हल्ल्यात उजव्या हाताला दात लागल्याने जखमी झाली. यावेळी दोघांच्या मदतीला धावलेले अंकुश यांचे वडील लक्ष्मण बिचुकले यांनाही पायाला बिबट्याची नखी लागल्याने ते जखमी झाले. यावेळी त्यांनी जोरात आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. यावेळी परिसरातील ग्रामस्थ व तरुण त्यांच्या मदतीला धावून आले.
दरम्यान, वनविभागाचे वनरक्षक महेश जगधने यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांचीही प्रकृती स्थिर आहे. जखमींवर निमगाव सावा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून, नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात व  त्यानंतर मंचर येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. निमगाव सावा परिसरात बिबट्यांना पकडण्यासाठी ग्रामस्थांच्या मागणीनुसार वनविभागाने  दोन पिंजरे लावले असल्याचे वनरक्षक महेश जगधने यांनी सांगितले.
02488

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : 'महिलांवर होणारे अत्याचार पाहून मला खूप दुःख होतंय आणि रागही येतोय'; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

Deep Amavasya : आषाढी अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा का केली जाते? या मागची कारणे आणि इतिहास जाणून घ्या

Kolhapur Ncp Leader Kill : राष्ट्रवादी नेत्याचे रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी केले पाच तुकडे, पोत्यात बांधून कर्नाटकातील नदीत फेकलं; कारणही भयानक

एका चुकीने १५ कोटींची संधी हुकली, दर महिन्याला HDFCचे शेअर्स खरेदी सुरु केली; १५ वर्षात इतके कमावले

ChatGPT: व्वाह! चॅटजीपीटी आता अधिक स्मार्ट, एका कमांडवर करेल सर्वकाही झटपट

SCROLL FOR NEXT