पुणे

समर्थ फार्मसीच्या ९ विद्यार्थ्यांना ‘केईएम हॉस्पिटल’मध्ये नोकरी

CD

बेल्हे, ता. १० : बेल्हे (ता. जुन्नर) येथील समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या ९ विद्यार्थ्यांची पूल कॅम्पस ड्राईव्हच्या माध्यमातून पुण्याच्या केईएम हॉस्पिटलमध्ये ‘ट्रेनी हॉस्पिटल फार्मासिस्ट’ या पदावर नोकरीसाठी निवड झाली आहे.
याबाबत समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संतोष घुले यांनी ही माहिती दिली. समर्थ शैक्षणिक संकुलात ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेलच्या वतीने पूल कॅम्पस ड्राईव्ह २०२५ चे आयोजन केले होते. मुलाखतीमध्ये दोन्ही औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या ६६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रथम फेरीमध्ये लेखी परीक्षेद्वारे निवड केल्यानंतर, अंतिम निवडीसाठी हॉस्पिटल येथे मुलाखतीचे आयोजन केले होते. यावेळी हॉस्पिटलचे एचआर हेड अर्देशीर बारिया व ईरा जोशी यांनी निवड प्रक्रिया पूर्ण केली.
ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. सागर तांबे व डॉ. बिपिन गांधी यांनी कॅम्पस ड्राईव्हचे यशस्वी नियोजन करण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत यांनी अभिनंदन केले.

निवड झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे:-
समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी- वैष्णवी दोरगे, ऋतुजा घोलप, वैष्णवी मोरे, धनश्री आरोटे व मेघा काळे.
समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी- निकिता सुपेकर, प्रियांका तांबे व चिदानंद कांबळे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic : वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांकडून टोल घेऊ नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना

Who is Arshad Khan? मुंबई इंडियन्सने पहिली संधी दिली अन् तो आता गुजरात टायटन्ससाठी ठरतोय एक्स फॅक्टर; RCB लाही दिलाय त्रास

Central Railway: मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक, लोकल सेवा पूर्ण बंद राहणार, मेल गाड्यांनाही फटका बसणार; कधी आणि कुठे?

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये ग्रामपंचायतीचा अभिनव निर्णय; विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना घरपट्टी माफी

Thane: ‘घोडबंदर’चा बोजा ठाणे पालिकेवर, देखभालीसाठी अडीच कोटींचा खर्च

SCROLL FOR NEXT