पुणे

बेल्हे येथे महामार्गावर एसटी घसरली; प्रवासी सुखरुप

CD

बेल्हे, ता. ८ : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर बेल्हे (ता. जुन्नर) येथील समर्थ शैक्षणिक संकुलाजवळ रस्त्याच्या साइडपट्ट्या न भरल्याने बुधवारी (ता. ८) एक एस. टी. बस रस्त्याखाली घसरली. चालकाने प्रसंगावधान राखत बस वेळीच थांबवल्याने मोठी दुर्घटना टळली असून प्रवासी सुखरूप आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस अहिल्यानगरहून कल्याणकडे जात होती. महामार्गावर सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला असलेल्या साइडपट्ट्या अद्याप भरलेल्या नाहीत. यामुळे बसचे चाक रस्त्याखाली घसरले. या परिसरात सुरक्षा फलक किंवा रक्षक नसल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी काम अर्धवट असल्याने एकेरी वाहतूक सुरू असून कसरत करावी लागत आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी सेवारस्ता आणि जोड रस्ते आवश्यक आहेत, तिथे तातडीने काम पूर्ण करावे. महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT