पुणे

शेळ्या रस्त्यात सोडून चोरटे पसार

CD

पारगाव, ता. १९ : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील हाडवळावस्ती येथे गुरुवारी (ता. १९) मध्यरात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास अनिल बाळू रोकडे यांच्या घराशेजारच्या गोठ्यातून चोरटे दोन शेळ्या चोरून घेऊन चालले होते. त्याचवेळी बाहेरगावी गेलेले रोकडे घरी आले. त्यामुळे चोरटे शेळ्या रस्त्यात सोडून अंधारात पसार झाले.
हाडवळा वस्तीत गण्या डोंगराशेजारी अनिल रोकडे यांची शेती व घर आहे. घराशेजारी पडवी असून, त्यात शेळ्या बांधल्या होत्या. रोकडे हे गुरुवारी रात्री मित्राबरोबर भराडी येथे ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी गेले होते. घरात त्यांची पत्नी व लहान मुले झोपली होती. मध्यरात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी पडवीची कडी काढून दोन शेळ्या दोरी सोडून शेळ्यांना गण्या डोंगराच्या दिशेने ओढत घेऊन चालले होते. नेमके त्याच वेळी अनिल रोकडे हे ऑर्केस्ट्रा पाहून घरी आले. त्यांना अंधारात शेळ्या ओरडण्याचा आवाज आला. शेळ्या कोणीतरी ओढत घेऊन चालल्याचे दिसले. त्यांनी जवळच राहणारे ग्रामपंचायत सदस्य कल्याण हिंगे पाटील यांना मोबाईल करून माहिती दिली. ते वस्तीवरील गुलाबराव हिंगे पाटील, ऋषिकेश हिंगे, संकेत हिंगे, अजित एलभर, संदेश हिंगे यांना घेऊन रोकडे यांच्या घराकडे गेले.
हे सर्वजण शेळ्यांच्या ओरडण्याच्या आवाजाच्या दिशेने गेले. मात्र, चोरट्यांना याची चाहूल लागताच घरापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर शेळ्यांना रस्त्यात सोडुन चोरटे गण्या डोंगराच्या बाजूला अंधारात पसार झाले. या सर्व तरुणांनी डोंगराच्या परिसरात शोध घेतला, परंतु चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. चोरटे दोघे होते. त्यांनी दुर कोठेतरी वाहन उभे करून आले असतील, असा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada House: म्हाडाच्या घरासाठी मुंबईकरांची झुंबड, दोन दिवसांत ३,३६२ अर्ज, निकाल कधी लागणार?

BJP Office: चंदीगडमध्ये भाजप कार्यालयाबाहेर स्फोट; संपूर्ण परिसर केला सील, भाजप नेते म्हणाले...

Pune News : डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरण विशेष सत्र न्यायालयाकडे वर्ग

LSG vs DC Live: कॅच सुटला, पण रिषभ पंतचा 'दुर्दैवी' कार्यक्रम झाला; लखनौचा कॅप्टन विचित्र पद्धतीने बाद झाला...

भाई, भलताच 'डेअरिंग'बाज निघाला... मॅच अर्ध्यावर सोडून लंडनसाठी पकडले विमान, १० खेळाडूंसह संघाला खेळावे लागले अन्...

SCROLL FOR NEXT