पुणे

मेंगडेवाडीत अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन

CD

पारगाव, ता. ३० : मेंगडेवाडी (गणेशनगर) (ता. आंबेगाव) येथे गणेशोत्सवानिमित्त रविवार (ता. १) ते रविवार (ता. ८) सप्टेंबरपर्यंत अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती गणेश देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.
सप्ताह काळात दररोज सकाळी पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते १० ज्ञानेश्‍वरी पारायण, ११ ते दुपारी १२ गाथा भजन, दुपारी ४ ते सायंकाळी ५ प्रवचन, ६ ते ७ हरिपाठ, सायंकाळी ७ ते रात्री ९ हरिकीर्तन त्यानंतर अन्नप्रसाद आणि १० नंतर हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहे. आकाश महाराज राजनाथ, हनुमंत महाराज गंमथडे, नीलेश महाराज कोरडे, गणेश महाराज वाघमारे, माउली महाराज कदम, गोविंद महाराज गोरे, दयानंद महाराज कोरेगावकर आणि अखेरच्या दिवशी अनिल महाराज तुपे यांचे सकाळी ९ ते ११ पर्यंत काल्याचे कीर्तन होणार आहे. शनिवारी (ता. ७) सकाळी श्रींची महापूजा, हारतुरे, मांडवडहाळे, शेरणी वाटप, दुपारी भजन स्पर्धा होईल. तर रविवारी (ता. ८) काल्याचे कीर्तन, श्रींची महापूजा, शेरणी वाटप, पालखीची मिरवणूक, महाप्रसादाच्या कार्यक्रमाने सप्ताहाची सांगता होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Asia Games 2026: भारताच्या पोरींनी पाकिस्तानला ठेचले; इंडोनेशियाविरुद्ध १७-१ अशा विजयाने हॉकीचे मैदान गाजवले

Parbhani Drought-Like Situation : पाणी, चारा, पीक पस्थितीचा आढावा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे प्रशासनास सतर्कतेचे निर्देश

रागात पाहिल्याने छातीवर सपासप वार..., मुंबईत गणेशोत्सवात रक्तरंजित थरार; 7 जणांकडून मंडळाच्या अध्यक्षाची हत्या

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT