पुणे

सार्थक भोर याचा प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर प्रथम

CD

पारगाव, ता. २४ : खोडद (ता. जुन्नर) येथील जीएमआरटी या संस्थेने राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय ऑनलाइन विज्ञान प्रदर्शन २०२५’ मध्ये विद्या विकास मंदिर (अवसरी बुद्रुक, ता. आंबेगाव) या विद्यालयातील सार्थक संभाजी भोर या विद्यार्थ्याच्या ‘प्लास्टिक पायरोलिसीस’ या प्रकल्पाचा राष्ट्रीय पातळीवर इयत्ता अकरावी व बारावी गटामध्ये प्रथम क्रमांक आला आहे, अशी माहिती विद्यालयाच्या प्राचार्या माधुरी खानदेशे यांनी दिली.
या प्रदर्शनामध्ये देशभरातून विविध राज्यांतील ४३० शाळा व महाविद्यालयांतील ९०२ प्रकल्पांनी सहभाग नोंदविला होता. यातून सार्थक भोरच्या प्रकल्पाची प्रथम क्रमांकासाठी निवड झाली आहे. या प्रकल्पामधे निरुपयोगी प्लास्टिक बाटल्यांपासून हायड्रोजन व वेगवेगळ्या प्रकारची संतृप्त हायड्रोकार्बन संयुगे इंधन म्हणून तयार होतात. या प्रकल्पासाठी त्याला प्रा. रामानंद वळसे व सुनीता शेळके-हिंगे यांनी मार्गदर्शन केले. या प्रदर्शनातील पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी (ता. २०) पुण्यातील आयुका संस्थेच्या आवारातील ‘एनसीआरए’ संस्थेच्या सभागृहामधे पार पडला. पारितोषिक वितरण समारंभासाठी एनसीआरएचे प्रमुख प्रा. यशवंत गुप्ता, प्रा. दिव्य ओबेरॉय, प्रा. ईश्‍वर चंद्रा, डॉ. जी. के. सोळंकी, नीलेश छडवेलकर हे उपस्थित होते.
त्याच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. विष्णूकाका हिंगे पाटील, उपाध्यक्ष योगेश चव्हाण, सचिव वसंतराव हिंगे, खजिनदार दीपक हिंगे व संचालक यांनी सार्थकचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना आली चक्कर, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची विश्रामगृहाकडे धाव

Maharashtra Transportation: आता मद्यवाहतुकीला बसणार ‘ई-लॉक’चे कवच, जीपीएस ट्रॅकिंगमुळे अवैध विक्रीवर अंकुश बसणार!

Independence Day 2025 : स्पेसपासून चेसपर्यंत! गुगल डूडलने कसा साजरा केला भारताचा स्वातंत्र्यदिन? पाहा एका क्लिकवर

Viral Video : नोटा मोजताना राहा सावधान, नाहीतर लागू शकतो चुना, नव्या स्कॅमचा व्हिडिओ व्हायरल

Buldhana Farmers: नुकसान भरपाई मेल्यावर देणार का? शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT