पुणे

यंदाचा आखाड मांसाहारी खवय्यांसाठी पर्वणी

CD

पारगाव, ता. २२ : यंदाचा आखाड मांसाहारी खवय्यांसाठी पर्वणी ठरला आहे. नजीकच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच नगरपालिकांच्या निवडणुका होणार असल्याने इच्छुक उमेदवारांकडून या वर्षी प्रथमच गावपातळीपासून तालुकापातळीपर्यंत आखाड महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. खवय्यांना खूष करण्यासाठी मटण, चिकन, माशांची मेजवानी ठेवण्यात येत आहे. त्यामुळे यंदाचा आखाड मांसाहारी खवय्यांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.
राज्यात तीन ते साडेतीन वर्षे लांबलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायतीच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. नजीकच्या चार-पाच महिन्यांच्या कालावधीत या सर्व निवडणुका होण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्ष्यांबरोबर इच्छुक उमेदवारही तयारीला लागले आहे .
आखाड महिन्यात मांसाहारी खवय्यांसाठी चंगळ असते. गावोगावी आखाड पार्टीचे आयोजन केले जाते. मांसाहारी हॉटेल ग्राहकांच्या गर्दीने गच्च झालेली दिसत आहे. आयताच चालून आलेल्या आखाड महिन्याच्या संधीचा फायदा घेत इच्छुक उमेदवार आखाड महोत्सवाचे आयोजन करू लागले. गावोगावी फलक लावून, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना निमंत्रणे दिली जातात. मांसाहारी जेवणाबरोबर करमणुकीसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
आंबेगाव तालुक्यात प्रथमच शिवसेनेच्या एका नेत्याने जाहीररीत्या आयोजित केलेल्या आखाड पार्टीची चांगलीच चर्चा झाली. सुमारे ५० बकऱ्यांचा बेत होता. तीन हजार लोक जेवल्याची चर्चा आहे. शाकाहारी नाराज होऊ नये म्हणून त्यांचीही काळजी घेत मासवडीचा बेत ठेवला होता. उपस्थितांचा टॉवेल-टोपी देऊन सन्मान करण्यात आला.
शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील राष्ट्रवादीच्या एका नेत्याच्या आखाड पार्टीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली. सुमारे ७०० किलो मटण, ७०० किलो चिकन, तसेच एक टन मासे असा जंगी बेत होता. तीन हजाराहून अधिक लोकांनी आस्वाद घेतल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

पाच हजार किलो चिकनचे मोफत वाटप
गुरुवारी (ता. २४) गतहारी (गटारी) अमावस्या असल्याने आषाढ महिन्यातील दोन दिवस शिल्लक असल्याने दोन दिवसांत आणखीन आखाड पार्ट्यांचे आयोजन होण्याची शक्यता आहे. पुणे शहरातील विश्रांतवाडी, लोहगाव परिसरातही धनंजय जाधव फाउंडेशनच्या वतीने आखाडानिमित्त पाच हजार किलो चिकनचे मोफत वाटप कार्यक्रम ठेवला होता. त्यामुळे या वर्षीचा आखाड मांसाहारी खवय्यांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Train: वंदे भारतमध्ये २७ जुलैपासून होणार बदल, प्रवाशांना होणार फायदा; वाचा सविस्तर

Karad News : मराठी-हिंदी भाषेवरुन मंत्री मंगलप्रभात लोढांचा ठाकरे बंधुना खोचक टोला, म्हणाले...

Monsoon Alert: उद्यापासून पाऊस परतणार! राज्यातल्या 'या' भागांना रेड अलर्ट

Bihar Voter List Update: बिहार मतदार यादी पडताळणीबाबत मोठी निवडणूक आयोगाने दिली मोठी अपडेट! ; संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गोंधळ

Latest Maharashtra News Updates: शिळोणा घाटात रात्री अस्वलाचा वावर

SCROLL FOR NEXT