पुणे

मजुरांचे पगार थकल्याने घरकुलांना ‘ब्रेक’

CD

पारगाव, ता. १४: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कर्मचारी गेली दोन आठवड्यांपासून संपावर असल्याने ''मनरेगा''तून मजुरांना पैसे मिळत नसल्याने ग्रामीण भागातील घरकुलांची कामे अर्धवट अवस्थेत बंद पडली आहेत.
ग्रामीण भागात बेघर कुटुंबांना शासनाच्या वतीने घरकुल बांधण्यासाठी निधी उपलब्ध केला जातो. यामध्ये एक लाख २० हजार बांधकामासाठी, १२ हजार शौचालय बांधकामासाठी, मनरेगातून २७ हजार व नवीन घरकुल असेल तर प्रधानमंत्री सौर घर योजनेतून ५० हजार रुपये अशाप्रकारे अनुदान मिळत असते. ग्रामीण भागात लाभार्थ्यांनी घरकुलाची कामे सुरू केली आहेत; परंतु महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कर्मचारी गेली दोन आठवड्यापासून संपावर असल्याने रोजगार हमी योजनेतील मजुरांचे हजेरीपत्रक व जॉबकार्ड भरता न आल्याने त्यांचे पगार होत नाहीत त्यामुळे घरकुलांची कामे अर्धवट अवस्थेत बंद पडली आहे. घरकुलाचे काम पूर्ण केल्यास रोजगार हमी योजनेतील २७ हजार रुपयांचे अनुदान मिळणार नाही त्यामुळे लाभार्थ्यांना घरकुलांचे काम अर्धवट अवस्थेत बंद ठेवावे लागले आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्याचे काम शासनस्तरावर सुरू आहे. आम्हीही इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने मजुरांचे हजेरी पत्रक तसेच जॉब कार्ड भरण्याचे काम करत असून मजुरांचे पगार करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
- प्रमिला वाळुंज, गटविकास अधिकारी, आंबेगाव तालुका

6600

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway: नाशिक-मुंबई प्रवास सुपरफास्ट! रेल्वे वाहतूक कोंडी फुटणार, कसारा- मनमाड तिसऱ्या-चौथ्या मार्गाला मंजुरी; कधी होणार पुर्ण?

Maha Shivratri 2026: चंद्राचे मकर राशीत गोचर, 'या' 3 राशींना महाशिवरात्रीला मिळणार राजयोगाचा मोठा लाभ

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरेंचे सुपुत्र तेजस ठाकरेंना रुग्णालयात केलं दाखल

T20 World Cup: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या डगआऊटमध्ये घुसला साप; Video होतोय तुफान व्हायरल

Supreme Court: ४०० सिमेंट पिशव्या, ३२ वर्षांचा संघर्ष… अखेर सुप्रीम कोर्टाचा निकाल! छत्रपती संभाजीनगर प्रकरणात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT